Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ जानेवारी, २०२०
शेगाव नगर परिषद उपाध्यक्ष पदी सौ ज्योती ताई संजय कलोरे यांचा विजय
प्रतिनिधी:शेगाव येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाची 17 जानेवारी रोजी महात्मा ज्योतिराव ज्योतिबा फुले सभागृह निवडणूक पार पडली.
यामध्ये भाजपच्या नगरसेविका सौ ज्योती ताई संजय कलोरे ह्या 19 मध्ये घेऊन विजय झाले आहेत. भाजपकडून सौ ज्योतीताई कलोरे यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली होती.
तर काँग्रेस राष्ट्रवादी भारीपच्या गटातून सौ. शारदाताई रवींद्र रायणे . यांनी तर शिवसेने कडून दिनेश लक्ष्मण शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली होती. यामध्ये दिनेश शिंदे यांनी माघार घेतली तर राणे यांना सात मते मिळाली व सौ. ज्योती कलोरे यांना 19 मते मिळवून त्यांची नगरपरिषद उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे तसेच एमआयएम तटस्त राहली.
भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल, नगराध्यक्ष सौ शकुंतलाताई पांडुरंग, माजी उपनगराध्यक्ष सौ.ज्योतीताई कचरे, माजी नगराध्यक्ष पी एम शेगोकार , पांडुरंग बुच, विजय बापू देशमुख, माजी सभापती संजय कलोरे, पाणीपुरवठा सभापती गजाननराव जवंजाळ, स्थायी समिती सदस्य पवन महाराज शर्मा, शिवसेना शहर प्रमुख संतोष घाटोळ, सौ वर्षा ताई धमाळ, सौ छाया ताई पल्हाडे, सौ रत्नमाला ठवे, अलकाताई खांनझोडे, सौ. मंगलाताई कमलाकर चव्हाण, सौ सुषमा ताई शेगोकार, सौ. रजनीताई पुरकर, सौ. ज्योतीताई चांडक, सौ. माला ताई देशमुख, कृउबास संचालक अंड समीर मोरे, नगरसेवक राजू कलोरे, मंगेश ढगे, आशिष गंणगणे, शैलेश डाबेराव ,प्रदीप सांगळे, शहर सरचिटणीस दीपक धमाल, सामाजिक कार्यकर्ते दिनेश बापू देशमुख,कमलाकर चव्हाण, अशोक चांडक, भागवत रोठे, गजानन हांडे, प्रमोद काठोळे, गोपाल पांडे, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर सभागृहात सर्व पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा