Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ जानेवारी, २०२०

कुरखळी येथे मिश्र संगीताच्या तालावर नृत्याविष्कार सादर करून प्रजासत्ताक दिन साजरा




कुरखळी:प्रतिनिधी:योगेश्वर मोरे: दिनांक 26 जानेवारी2020 रोजी कुरखळी येथील जिल्हा परिषद शाळेत 71 वा भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

गावातील उच्च पदावर कार्यरत महिलेला ध्वजारोहनाचा मान देऊन गावाने पुन्हा एकदा नवा आदर्श उभा केला आहे यावरून बेटी पढाओ चा व बेटिया गाव का सम्मान ची आठवणही करून देण्यात आली.


आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य अवधूत मोरे हे होते तर प्रमुख अतिथी नायब तहसीलदार म्हणून निवळ झालेल्या व सध्या मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या भानुप्रिया निलेश शिरसाठ ह्या होत्या.

सुरुवातीला संविधानाच्या उद्धेशिकेची सामूहिक शपथ घेण्यात आली. व सौ. भानुप्रिया शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या नंतर देशभक्ती, स्वराज्य, गर्जा महाराष्ट्र, भवानी चा जयघोष,शिवरायांचा मराठी बाणा असे सांस्कृतिक कार्यक्रम शाळेतील बाल कलाकारांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

शिवाजी महाराजांच्या कार्याची झलक हुबेहूब सादर करून घोड्यावरून त्यांची भावमुद्रा कार्यक्रमातून प्रतिबिंबित करण्यात आली.

कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच सीताराम भिल,उपसरपंच सुनंदा कोळी,ग्रामपंचायत सदस्य जगदीश मोरे,सुरेश मोरे,आदेश भिल,सुनंदा कोळी,सुशीला भिल,बेबाबाई भिल,भटाबाई भिल, महारू भिल,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वास भिल व सदस्य,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष भाऊसाहेब मोरे,पोलीस पाटील वसंत धनगर,माजी सरपंच पुरुषोत्तम कोळी,अशोक तात्या धनगर, शिक्षणप्रेमी पोपटराव शिरसाठ,पत्रकार योगेश्वर मोरे,आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी,देविदास कोळी,पाहजी मोरे,ज्ञानेश्वर मोरे ,बाळू मोरे,नरेश मोरे, आत्माराम कोळी, अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ, तरुणवर्ग व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश माळी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक रघुनाथ गित्ते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी योगिता नेरकर यांनी परिश्रम घेतले.

भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायत कुरखळी यांच्या मार्फत जि प शाळा कुरखळी ता. शिरपूर जि. धुळे या शाळेतील जवळपास 100 मुलांना थंडीपासून बचाव व्हावा या दृष्टीने स्वेटर चे वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध