Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
प्रजासत्ताक दिनी सीमेवरील शहीद जवानाच्या जीवन प्रसंगात सहभागी होतांना श्री अर्जुनभोई
प्रजासत्ताक दिनी सीमेवरील शहीद जवानाच्या जीवन प्रसंगात सहभागी होतांना श्री अर्जुनभोई
प्रतिनिधी:मुंबई :२६ जानेवारी या दिवशी आम्ही आमच्या देशाला लोकशाही, सार्वभौम, गणराज्य देश म्हणून साजरा करतो.
या दिवसाला भारतात विशेष महत्त्व आहे. या दिवशी संपुर्ण भारत पूर्णपणे स्वातंत्र झाला होता. आजच्या पवित्र दिवसाचे महत्त्व विशद करतांना भारतीय जवानांच्या जीवन काळाला डोळ्यासमोर ठेऊन विद्यालयीन व महाविद्यालयीन मुलामुलींच्या समोर तो उभा करतांना आणि एक राजकीय सेवकाची भुमिका साकार करताना आम्हाला धन्यता वाटली.
अनेकांना आजही राज्यातील आमच्या सामाजिक जीवनपातळीवरुन या दिवसाचं, आपल्या हक्काचं महत्त्व काहींना माहित नाही कारण आजही माझा समाज व त्यातील काही समाजघटक हा वैचारिक ज्ञानाच्या सीमारेषेवर दिसत नाही.
राज्यातील माझा भटका समाज भटकंतीच्या किंवा समाज बिकट परिस्थितीच्या चक्रात तो आजही आपल्याला अडकलेला दिसत आहे.
समाजघटक हो, आजच्या दिवसाचे महत्त्व पाहतांना आपल्याला मागील इतिहास हा पहावा लागेल २६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५० हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करुन त्यानंतर दोनच महिन्यांत म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली त्यानुसार भारतदेश हा एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २वर्षे ११महिने आणि १८दिवस सुरू होते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य देश म्हणून बनला आणि त्यातच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आम्ही साजरा करतो. भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन भारतात १९५० साली साजरा करण्यात आला होता. १९५० रोजी आपल्याला भारताचं संविधान आणि डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या रुपात भारताचे प्रथम राष्ट्रपती मिळाले होते.
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून आजही विविध देशातील राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचीही परंपरा सुरू झाली. संपुर्ण भारतीयपटलाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय जवानांचे फार मोठे योगदान आहे. दिवंगत भारतीय जवानांना व त्यांच्या संपुर्ण परिवारास या दिवशी आमचा मानाचा मुजरा
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा