Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ जानेवारी, २०२०
सेवाव्रत आपले सरकार सेवाकेंद्राचा शुभारंभ
शिरपूर:प्रतिनिधी:शहरातील सेवाव्रत आपले सरकार केंद्राच्या माध्यमाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे काम गेल्या अठरा वर्षापासून सुरु असतांना केंद्राचे संचालक हेमराज राजपूत यांच्या माध्यमाने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना जनमानसात पोहचविण्याचे काम करीत केंद्राचे स्ववास्तू निर्माण करून प्रवेशाच्या शुभारंभाप्रसंगी श्रीसत्यनारायण महाराजांची महापूजा व परमपूज्य भारतमाता प्रतिमा पुजन सेवाव्रत कार्यालय,६ श्रीगायत्री माता शॉपींग कॉम्प्लेक्स, मुख्य पोस्ट ऑफिस समोर शिरपूर येथे रविवार दि.२६ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजेपासून आयोजित केले आहे.
केंद्राच्या माध्यमाने शासकिय दाखले, परवाने, आधार नोंदणी व दुरुस्ती, पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदान कार्ड, ई-गॅझेट, संस्था , बचतगट, मंडळ, स्थापना , रोजगार, स्वयंमरोजगार, कौशल्यवृध्दी प्रशिक्षण, उद्योग मार्गदर्शन त्याच बरोबर अॅम्ब्युलन्स व गरीब दिव्यांगांसाठी साहित्य सेवा दिली जात आहे.
तरी आपल्या सर्वाच्या प्रमुख उपस्थितीत व आई-वडील यांच्या शुभहस्ते कार्यालयाचा शुभारंभ करण्याचे योजिले आहे.
तरी तालुक्यातील जनतेने कार्यक्रमास सहभागी होवून आपले डिजीलॉकर नोंदणी करुन शिरपूर तालुका डिजिटल करण्याचा संकल्प साकार करण्यासाठी कार्यक्रमांस उपस्थितीचे आवाहन कार्यवाहक हेमराज राजपूत यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा