Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

शिरपूर तालुका वारकरी सेवा मंडळ, शिरपूर च्या वार्षिक बैठकीचे अयोजन


शिरपूर:प्रतिनिधी:शिरपूर तालुका वारकरी सेवा मंडळ, शिरपूर ची सन २०२० ची वार्षिक सर्वसाधारण सभा 
रविवार दि. २६ रोजी, दुपारी ठिक : १.०० वाजता श्री गायत्री माता मंदीर, मुख्य पोस्ट ऑफिस जवळ, आदर्श नगर शिरपूर येथे आयोजित केली आहे. 
त्यात खालील विषयांवर चर्चा होणार आहे. मागील इतिवृत्ताचे वाचन करणे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज उत्सव साजरा करणेबाबत चर्चा करणे. व  सन २०२० ते २०२३ पर्यंत शहर व तालुका कार्यकारणी निवड करणे. 

बैठकीत वरील विषयांवर सविस्तर चर्चा घडवुन शिरपुर तालुका वारकरी मंडळाचे कार्य अधिकाधिक व  शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात वारकरी भजनी मंडळ तयार करणे, तसेच वारकरी संप्रदायाचे कार्य वाढीसाठी आपण सर्व ह.भ.प. किर्तनकार, वारकरी, टाळकरी, माळकरी, भजनी मंडळाचे बंधु भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिरपूर तालुका वारकरी सेवा मंडळ, शिरपूर चे तालुकाध्यक्ष ह.भ.प. काशिनाथ पाटील व ता. संघटक ह.भ.प. हेमराज राजपुत यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध