Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
शेगाव तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहिर अध्यक्षपदी राजेश चौधरी कार्याध्यक्ष नंदू कुलकर्णी सरचिटणीस देवानंद उमाळे
शेगाव तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहिर अध्यक्षपदी राजेश चौधरी कार्याध्यक्ष नंदू कुलकर्णी सरचिटणीस देवानंद उमाळे
शेगाव:प्रतिनिधी:मराठी पत्रकार परिषद सलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाची संयुक्तिक नुतन कार्यकारिणीची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी केली.
यात अध्यक्षपदी राजेश चौधरी तर कार्याध्यक्षपदी नंदू कुलकर्णी व सरचिटणीस पदी देवानंद उमाळे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच उर्वरीत कार्यकारणीत उपाध्यक्षपदी फईम देशमुख, अमर बोरसे, कोषाध्यक्ष विजय मिश्रा, सहसचिव दिनेश महाजन , धनराज ससाने,तर कार्यकारणी सदस्य म्हणून नानाराव पाटील, देविदास कळसकर, श्याम देशमुख , निमंत्रित सदस्य म्हणून अनिल उंबरकार व संजय सोनोने यांचा समावेश आहे.
मराठी पत्रकार परिषद परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या आदेशानुसार, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत झाली असून मराठी पत्रकार परिषदेची संलग्नता प्रदान करण्यात आली आहे.
ही संयुक्तिक कार्यकारिणी सन 2020 - 21 ते 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी राहील.
अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अनिल उंबरकार यांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा