Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

सुखाचा सोहळा........!



लेखक: लक्ष्मण गंगाधर वाल्डे -पिशोरकर 

 बोच-या  विचारांच्या प्रहारेवर...,
आमच्या वास्तववादी विचारांची,
 ही ढाल आहे......! 

चाहुल नाही कुणाची....,
ही रण निती आमच्या मनाची  आहे.....! 

हळव्या मनाचा आमचा घेरा.....,
नियती सारखा  फेरा आहे........! 

एकते पुढे .....,
तुमच्या आमच्या ......,
परकेपणा फिरकत नाही कुठे.......! 

आमचा रे नाद खुळा....,
सगळ्यांना आम्ही करतो गोळा...!
उधळुनी दुःख सारे.....,
करतो साजरे सुखाचे  सोहळे ....!

फोडनीला ठेवत नाही ....,
कुठलाच  'मी' पणा.......! 
ओवाळुनी टाकतो आम्ही.
वास्तववादी जातीना.....!

आमच्या प्रेमाची रित लय भारी...,
नांदतय समतेच सौभाग्य आमच्या दारी....!

मया आमची उतावळी ....,
पोरक्या पणाला आम्ही कवटाळी.......!

सुख -दुःखात आमची भागिदारी..,
उडत गेली मग दुनियादारी......!

आमची ही रितच लय न्यारी .....,
कुणीच कधी समजु शकली नाही.

कळत थोड थोड.....,
पण  हे कुणाला का...?
 काहीच वळत नाही.....! 

प्रश्न पडतो तर......,
उत्तर शोधायला हल्ली  का येत नाही...!

जरी आमचे  चिञ दिसायला
 अवघड वाटले तरि ,
समजायला सोपे आहे......!

सहवास आमचा लाभुद्या तुम्हाला ..,
प्रश्न कधी पडणारच नाही....! 

हेच आमच भाग्य ......,
आमच्यात घोळुन मिसळून राहिल्या  शिवाय ,
ते कधी  लाभणारच नाही....!

आमचा रे नाद खुळा....,
सगळ्यांना आम्ही करतो गोळा...!
उधळुनी दुःख सारे.....,
साजरा करतो सुखाचा  सोहळा....!

--------------------लक्ष्मण गंगाधर वाल्डे -पिशोरकर .
                          मो.नं-8888606068 .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध