Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ जानेवारी, २०२०

नाईन न्यूज वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरचे भूमिपुत्र पोलिस अधिकारी मंगलसिंग सूर्यवंशी यांचा गोदा पुरस्काराने सन्मान



पालकमंत्री छगन भुजबळ, सामनाचे संपादक खासदार  संजय राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

 
नाशिक:प्रतिनिधी नाईन न्यूज वृत्तवाहिनीच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त या वर्षीचा गोदा सन्मान पुरस्कार पालकमंत्री छगन भुजबळ, दैनिक सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गोदा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी खासदार संजय राऊत यांनी पुरस्कारर्थीनचे अभिनंदन करून असेच कार्य समाजात करत राहावे म्हणून सांगितले. तर भुजबळांनी :गोदा सन्मान कार्यक्रम पाहून मला नासिक फेस्टिवलची आठवण आली आहे व निर्भीड व निपक्ष वावरणाऱ्या  9न्यूज चॅनलचेचे स्वागत करून चांगल्या कर्तृत्ववान कार्य करणाऱ्या समाजातील लोकांना आपण शोधून त्यांचा एवढ्या उत्साहात गोदा सन्मान पुरस्कार देतात त्याचे देखील कौतूक केले.  

खासदार संजय राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रस्तावना संचालक किशोर बेलसरे यांनी केली. कार्यक्रमास पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, आमदार माणिकराव कोकाटे,जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर,आमदार नितीन पवार,आमदार देवयानी फरांदे ,उपमहापौर भिकुबाई बागुल, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर विनायक पांडे  आदी मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी तिरंगी फुगे सोडून देशभक्ती गीतांवर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन  न्यूजचे संचालक:  किशोर बेलसरे, अशोक कुटे, चीराग शर्मा , यांच्या वतीने करण्यात आले होते.

यांना करण्यात आले गोदा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित हर्षवर्धन सदगीर ( क्रीडा, महाराष्ट्र केसरी  दिलीपराव बनकर ,(सहकार),  जयप्रकाश पवार उत्कृष्ट पत्रकार (प्रिंट मीडिया) , शीतल सांगळे (राजकीय),  हिमगौरी आडके (कार्यक्षम नगरसेविका),संजय घुगे (उत्कृस्ट अभियंता) , मंगलसिंग सूर्यवंशी (पोलीस प्रशासन), अंजनभाई भालोडिया (बांधकाम),डॉ. सुरेश जगदाळे ( आरोग्य),  सुरेश पाटील (शिक्षण व राजकीय),  अनिल आहेर (सामाजिक व उद्योग),बापू पिंगळे (कृषी), चंदन पूजाअधिकारी(उत्कृष्ट पत्रकार ),देवेश कारडा(युवा उद्योजक ).ह्या सर्वन पुरस्काथींना गोदा सन्मान देऊन  पुरस्कृत करण्यात आले. 

यामध्ये पो.आ विश्वास नांगरे पाटील , आपण पंचवटीकर (पूरग्रस्त मदत निधी) ,ग्रंथ तुमच्या दारी ( कुसुमाग्रज प्रतिष्ठान) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले . गायन:जल्लोश स्वरांचा सादरकर्ते ( मिना परुळेकर ,अमोल पाळेकर) व नृत्य पी. जी. इतरटंटमेंट (पंकज गांगुर्डे ग्रुप) ,सांबळ वादन   व देशभक्तीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष आभार कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा,डेनकेबल नेटवर्कचे आनंद सोनवणे,चित्रपट महामंडळाचे सदस्य श्याम लोंढे,प्रकाश बनकर,मनोज कर्पे, नाईन न्यूजच्या सहसंपादीका सुनीता चौहान ,योगेश सोनवणे ,ताबरेज शेख आदींचा सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध