Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ जानेवारी, २०२०
पत्रकार संघाच्या फैजपुर शहर अध्यक्ष पदी राजु तडवी यांची निवड !
जळगाव,(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या फैजपूर शहर अध्यक्षपदी पत्रकार राजू तडवी यांची निवड दि.28 जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्यातील सर्वाधिक पत्रकार सभासद असलेला पत्रकार संघ आहे. पत्रकारांच्या न्याय व हक्कासह सामाजिक उन्नत्ती साठी सदैव कटिबद्ध असलेला संघ म्हणून पत्रकार संघाने ओळख निर्माण केली आहे.
राज्यातील प्रत्येक शहरात, खेड्यात पत्रकार संघांचे काम पोहचले आहे. हे काम अविरत सुरु राहावे म्हणून व फैजपूर सारख्या एतेहासिक शहरात पत्रकार संघाच्या माध्यमातून काम व्हावे म्हणून पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मार्गदर्शनाने राजू तडवी यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडी बाबत जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, वृत्त वाहिनी विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, वृत्त वाहिनी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष ढिवरे यांनी अभिनंदन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा