Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ जानेवारी, २०२०

ऐनपूर महाविद्यालयात ग्रंथ दिंडी. मराठी विभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवाड्यात ग्रंथ दिंडी.



रावेर:प्रतिनिधी:निंभोरा बु ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवड्या निमित्त ग्रंथालय व मराठी विभागा मार्फत ग्रंथ दिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

महाविद्यालयातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. महेंद्र महाजन व विद्यार्थ्यांच्या डोक्यावर श्रीमद भगवदगीता, ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, महाराष्ट्राचा इतिहास, स्वामी विवेकानंदांची ग्रंथावली, ग्राम गीता अशा आदि ग्रथांचा या दिंडीत सहभाग होता.

 प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने यांनी ग्रथांचा परिचय करून देत मराठीभाषा  अनमोल आहे असे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांसह सर्व सामान्यापर्यंत पुस्तकी ज्ञान पोहचून  वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी भाषा पंधरवड्यात ग्रंथ दिंडी चे आयोजन करण्यात आले होते. प्रा.दिलीप सोनवणे यांनी प्रास्ताविकात मराठी भाषा सर्वात श्रेष्ठ भाषा असून मराठी मातॄभाषा असलेल्यांनी न संकोचता मराठीतुनच बोलले पाहिजे भरपूर ग्रंथ व पुस्तके मराठीत आहेत मराठी ही आपली मातृ भाषा असून तीला जोपासने हे आपले कर्तव्य आहे. मी मराठी असा आवर्जून त्यांनी उल्लेख केला.

प्राचार्य डाँ.जे.बी.अंजने यांच्या शुभहस्ते ग्रंथ दिंडी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल प्रा.संदिप साळूंके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ.पी.आर.महाजन यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा.व्ही.एच.पाटील, प्रा.डॉ. एस.ए.पाटील, प्रा.एस.बी.महाजन, प्रा.एच.एम.बाविस्कर, प्रा.डॉ. एस.एन.वैष्णव, विध्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस.पी.उमरीवाड, प्रा.एस.बी.महाजन, गोपाल महाजन, सुनिल पाटील, कुत्रू अवसरमल, गोपाल पाटील, हर्षल पाटील,  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी मोठ्या सख्येने दिंडीत सहभाग घेतला.

फोटोत:- ग्रंथ डोक्यावर घेऊन चालतांना महेंद्र महाजन सोबत प्राचार्य.डॉ.जे.बी अंजने, व आदि प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध