Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
पत्रकार दिनानिमित्त शहादा तालुका पत्रकार संघातर्फे गरजूंना ब्लँकेट वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करणत आला
पत्रकार दिनानिमित्त शहादा तालुका पत्रकार संघातर्फे गरजूंना ब्लँकेट वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करणत आला
तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मोतीलाल पाटील , पोलिस उपअधिक्षक पुंडलिक सपकाळे , सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी . आर . पाटील , सरकारी विधीज्ञ सुशिल पंडीत , शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी , माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर , माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी , संजय ताराचंद चौधरी , विनोद चौधरी , तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल , ज्येष्ठ पत्रकार रविंद्र पंड्या , नरेंद्र बागले , प्रा . ज्ञानी कुलकर्णी , सामाजिक कार्यकर्तेपरेश पवार , एकनाथ नाईक , भाजपाचे शहराध्यक्ष अतुल जायसवाल , दिनेश खंडेलवाल आदींची उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यक्रम सुरु करण्यात आला .
यावेळी मनोगत व्यक्त करतांना दीपक पाटील म्हणाले , पत्रकार हा समाजमनाचा आरसा असून शहादा तालुका पत्रकार संघाने राबविलेला उपक्रम प्रेरणादायी व आदर्श निर्माण करणारा आहे . शहाद्याची पत्रकारीता आगळीवेगळी असून अनेक समस्यांना वाचा फोडणारी आहे . येथील पत्रकारीता नि : पक्षपणे केली जात आहे . तसेच नगराध्यक्ष श्री . पाटील , डीवायएसपी श्री . सपकाळे यांनीही मनोगत केले . प्रास्ताविकांत ज्येष्ठ पत्रकार प्रा . दत्ता वाघ यांनी आचार्य बाळशास्त्र जांभेकर यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकतांना सांगितले की , आचार्य बाळशास्त्र जांभेकर यांनी आपल्या कमी वयात मोठी कामे केली आहेत .
समाजसुधारणेसह पत्रकारीतेक्षेत्रात त्यांचे बहुमोल योगदान आहे . त्यांच्या जन्मतारखेबद्दल अजुनही वाद आहेत . ६ जानेवारी रोजी त्यांनी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ केली .
त्यामुळेच हा दिवस पत्रकारसृष्टीत पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो . अत्यंत कमी वयात त्यांनी ग्रंथ लेखन केले आहे . वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते .
दर्पणामधून समाजमनाचे प्रबोधन करीत समाजजागृतीचे कार्य केले . दरम्यान , उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात येवून अन्नदान करण्यात आले तसेच लोणखेडा येथे अस्थीव्यंग शाळेत विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले . कार्यक्रमानंतर पत्रकारांतर्फे स्वच्छत मोहिम राबविण्यात आली . सदर उपक्रम शहादा तालुका पत्रकार संघ व दै . प्रश्नचिन्ह परिवाराने संयुक्तरित्या राबविला . कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा . नेत्रदीपक कुवर , प्रा . डी . सी . पाटील , हिरालाल रोकडे , बापू घोडराज , सुनिल सोमवंशी , चंद्रकांत शिवदे , योगेश सावंत , प्रा . ए . ए . खान , राजमल जैन , दीपक वाघ , हर्षल साळुखे , सुधीर कुलकर्णी , राजू कुलकर्णी , विजय अग्रवाल , हर्षल सोनवणे आदींनी परिश्रम घेतले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी श...
-
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे! प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा