Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचा सन 2020-2021 या वित्तीय वर्षाचा 117.65 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचा सन 2020-2021 या वित्तीय वर्षाचा 117.65 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर
शिरपूर:प्रतिनिधी:शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचा सन 2020-2021 या वित्तीय वर्षाचा 117.65 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
सन 2020-21 या वित्तीय वर्षाचे एकूण रक्कम रु.117.65 कोटी चे अंदाजपत्रक असून जनरल बोर्ड सभा दि. 7/2/2019 रोजी ते मंजूर करण्यात आले. सन 2020-21 या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रकात महसूली उत्पन्न रु. 32.07 कोटी अपेक्षित असून रक्कम रु. 36.40 कोटी भांडवली उत्पन्न अपेक्षित आहे तसेच इतर उत्पन्न रु. 6.47 कोटी इतके अपेक्षित आहे. यात आरंभीची शिल्लक रुपये 42.71 कोटी इतकी अपेक्षित आहे.
जमेच्या महत्वाच्या तरतुदी -
या उत्पन्नात घरपट्टी पासून रुपये 375 लक्ष, पाणीपट्टीपासून रु. 240 लक्ष, दुकान भाडे पासून रु. 75 लक्ष, बाजार रोजभाडे रु.30 लक्ष, विकास करापासून रु. 50 लक्ष, रिक्रिएशन गार्डनपासून/ ऍ़म्युझमेंट पार्क पासून उत्पन्न रु. 90 लक्ष, दवाखान्यापासून रु. 425 लक्ष, नागरी सुविधा उत्पन्न रु. 35 लक्ष, नळ कनेक्शन फी रुपये 10 लक्ष अपेक्षित आहे, शासकीय अनुदान रु. 1491 लक्ष अपेक्षित आहे.
वरील दर्शविलेल्या फी व्यक्तीरिक्त इतर फी रक्कम रु. 75.38 लक्ष अपेक्षित आहे. भांडवली अनुदान रस्ता अनुदान रु. 50.00 लक्ष, चौदावा वित्त आयोग अनुदान रु. 900.00 लक्ष, पंधरावा वित्त आयोग अनुदान रु. 900 लक्ष, पर्यटन व विकास योजना अनुदान रु. 50 लक्ष,
सु.ज.यो.नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) अनुदान रु. 100 लक्ष, दलित वस्ती अनुदान रु. 100 लक्ष, रमाई आवास योजना रु. 20 लक्ष, आमदार व खासदार निधी रु. 35 लक्ष, नगर रचना अनुदान रु. 20.00 लक्ष, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान रु. 100 लक्ष, पंतप्रधान आवास योजना रु. 150 लक्ष, अल्पसंख्याक अनुदान रु. 10, घनकचरा व्यवस्थापन अनुदान रु. 125 लक्ष, सुवर्ण जंयती नगरोत्थान अंर्तगत रस्ते प्रकल्प रु. 800 लक्ष, दलित्तेर अनुदान रु. 10 लक्ष, स्वच्छ महाराष्ट्र योजना रु. 125 लक्ष, विशेष अनुदान रु. 50 लक्ष, अग्निशामक अनुदान रु. 75 अपेक्षित आहे.
खर्चाच्या महत्वाच्या तरतुदी – सिमेंट कॅाक्रीट रोड - रु. 2050 लक्ष, डांबरी रोड- रु. 75 लक्ष, कच्चे रोड- रु. 75 लक्ष, नविन दवाखाना बाधंकाम करणे रु. 250 लक्ष, प्राथमिक शाळांना डिजीटल करणे रु. 60 लक्ष, घनकचरा व्यवस्थापना करीता रु. 325 लक्ष, पंतप्रधान आवास योजना रु. 400 लक्ष, शिरपूर शहरात उर्वरीत राहिलेल्या ठिाकाणी भुयारी गटार बनविणे रु. 600 लक्ष, जमीन संपादन करणे रु. 200 लक्ष, शॉपींग सेेंटर बांधकाम रु. 100 लक्ष, जिमनॅशिअम हॉल/ओपन जिम रु. 50 लक्ष, पाणीपुरवठा पाईप लाईन टाकणे रु. 400 लक्ष, दवाखाना यंत्रसामग्री खरेदी रु. 100 लक्ष, रस्त्यावरील दिवाबत्ती रु. 50 लक्ष, कर्मचारी निवास स्थान बाधंणे रु. 65 लाख, कंपॉऊड वॉल बाधंकाम रु. 75 लाख, संरक्षण भिंत बांधकाम रु. 100 लक्ष, समाज मंदीर बांधकाम व इलेक्ट्रीफिकेशन करणे रु. 80 लक्ष, ऍम्युझमेन्ट पार्क भांडवली साठी रु. 275 लक्ष, रमाई आवास घरकूल रु. 75 लाख, आरोग्य स्वीपर रु. 20 लक्ष, नागरीकांसाठी घरकुल योजना राबविणे रु. 500 लक्ष, वैयक्तिक शौचालय बांधकाम रु. 30 लक्ष, नगरपरीषद कार्यालय बाधंकाम व फर्निचर इत्यादी साठी रु. 95, लक्ष, बागेसाठी उपकरणे खरेदी करणे रु. 50 लक्ष इ. अपेक्षित आहे.
सन 2020-21 या वर्षात एकूण खर्च रुपये 117.65 कोटी इतका अपेक्षित असून महसूली खर्च रक्कम रु. 39.74 कोटी, भांडवली खर्च रु. 61.49 कोटी व इतर खर्च रु. 16.40 कोटी अपेक्षित आहे. यात आजअखेर शिल्लक रु.1.93 लक्ष इतकी अपेक्षित आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांचे मागदर्शनाने व शिरपूर नगरीच्या नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष व विदयमान स्थायी समिती सदस्य प्रभाकरराव चव्हाण, नगरसेवक मोहन हुलेसिंग पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी सभेत मार्गदर्शन केले.
तसेच मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधवराव पाटील, मोहन जडिये, आरती काळे, मयुर शर्मा यांनी सभेत अंदाजपत्रकाबाबत माहिती दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा