Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०
धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस सश्रम कारावास व दीड लाखाचा दंड
रावेर दि.७ ( प्रतिनिंधी ) येथील न्यायालयाने चेक अनादर झाल्या प्रकरणी आरोपीस सश्रम कारावासासह दिड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असुन दंडाची रक्कम न भरल्यास वाढीव तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच दंडाची रक्कम रु. ५०००/- सरकार ला जमा करावी लागेल. व रक्कम रुपये १४५०००/- फिर्यादीला देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे चेक देऊन फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
अधिक असे. की, मुंदखेड ता. जामनेर येथील रहिवाशी सुनील जगानन जोशी याने जिल्हा न्यायालयातील एम.ए.सी.टी.दरखास्त मध्ये तडजोडीमध्ये एकूण रक्कम ८,५०,०००/- रुपयामध्ये तडजोड होऊन रक्कम रुपये २००००/- तडजोडीच्या वेळेस नगदी दिले होते. व बाकी रक्कम ८,३०,०००/- चे आठ चेक दिले. त्यात सात चेक प्रत्येकी एक लाख रुपया प्रमाणे दिले व एक चेक १ लाख ३०००० या रक्कमेचा दिला होता.
सदर फिर्यादी सुशीला अनिल चौधरी हिने आरोपी सुनील गजानन जोशी यांच्याकडे वेळोवेळी रक्कमेची मागणी केली त्याने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यापैकी पहिला एक चेक १ लाख रुपयांचा अनादर प्रकरणी रावेर न्यायालयाचने निकाल दिला आहे. सदर कामी सुनील जोशी याने त्यांच्या बचत खात्याचा धनादेश देऊन सदर तडजोडीची रक्कम देण्याची हमी व खात्री दिली होती. मात्र सुनील जोशी याने त्यांच्या बचत खात्यामध्ये धनादेश दिलेली रक्कम शिल्लक न ठेवता अनादर केला.
त्यामुळे सुशीला चौधरी यांची फसवणूक केली म्हणून आरोपी विरुद्ध निगोशिएबल इस्टूमेंट अॅक्ट कलम १३८ प्रमाणे रावेर येथील न्यायालयात खटला दाखल केला होता त्या अनुषंगाने फौजदारी खटल्याच्या चौकशी अंती रावेर येथील फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश प्रथम श्रेणी न्यायमूर्ती महाशय आर.एल. राठोड साहेबांनी दिनांक ०५/०२/२०२० रोजी न्याय निर्णय देऊन आरोपी सुनील गजानन जोशी यास सश्रम कारावास तसेच दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
तसेच दंडाची रक्कम न भरल्यास वाढीव तीन महिने ज्यादाची शिक्षा दिली असुन दंडाची रक्कम १.४५.००० रुपये फिर्यादी सुशीला अनिल चौधरी यांना देण्याचा देखील आदेश न्यायालयाने आदेश पारित केला. त्याच वेळी महाशय न्यायालयाने आरोपी सुनील गजानन जोशी रा. मुंदखेडा ता. जामनेर, यास रावेर पोलिसांच्या ताब्यात दिले. व फिर्यादी कडून फिर्यादी कडून अॅड. जगदीश एम. महाजन रा. वाघोड ता. रावेर व अॅड. सलीम एम. जामलकर रा. मोरगाव ता. रावेर व ज्युनिअर म्हणून अमोल नाईक यांनी कोर्टाचे काम पाहिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा