Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

रावेर तालुक्यातील पाल येथे दिनांक 4 फेब्रुवारी रोजी जनकल्याण आदिवासी बहुउद्देशीय संस्था संचलित एन एन तडवी उर्दू हायस्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलन


रावेर:प्रतिनिधी:माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी नासिर साहेब तडवी होते दीपप्रज्वलन हाजी बाबु तडवी यांच्या हस्ते करण्यात आले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ सर व एजाज़ सर यांनी केले सर्व मान्यवरांचे सत्कार पुष्प देऊन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात कुरान पाकचे पठण करून सुरू करण्यात आले या कार्यक्रमात भरपूर देशभक्ती गीत व कव्वाली चे गायन करण्यात आले तसेच माजी  विद्यार्थी मोहम्मद इस्हाक शेख व इम्रान तडवी यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेचा इतिहास सांगितला व नविद सर यांनी सुद्धा शाळेचा इतिहास सांगितला या कार्यक्रमात गावातील सरपंच कामिल तडवी रुबाब साहेब तडवी सत्तार अक्रम अफजलखान युनूस शेख व गावातील नागरिक बहुत संख्यात उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध