Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०
ऐनपूर महाविद्यालयात व्यक्तीमत्व विकास अंतर्गत व्याख्यान संपंन्न.
रावेर:प्रतिनिधी:निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथील सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने व्यक्तिमत्व विकास कार्यशाळे (मुले/मुली- १० व्याख्याने ) अंतर्गत तज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास परिसरातील जिल्हा परिषद सदस्य नंदकीशोर महाजन हे उपस्थित होते.
व्याख्यानाचे प्रथम पुष्प कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. जतीनकुमार मेढे यांनी गुंफले यांच्या व्याख्यानाचा विषय भाषण, संभाषण , सूत्रसंचालन कौशल्य हा होता त्यात त्यांनी सर्वसामान्य जीवनामध्ये संभाषण कौशल्य याचे अनन्य साधारण महत्व व त्याचा व्यक्तिमत्व विकासात त्याचे महत्व विशद केले. सुत्रसंचलन ही एक कला आहे आणि ती सरावाने विकसित करता येते.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प भारत सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाव यांचे समन्वयक डॉ.राजेंद्र फडके यांनी गुंफले डॉ.फडके यांनी बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमांची माहिती उद्दिष्टे व त्याची उपयुक्तता याविषयी सखोल असे मार्गदर्शन करून आपल्या देशातील बेटी बचाव बेटी पढाव ची व्याप्ती सांगून सद्यस्थितीत स्त्री-पुरुष असमानता, स्त्रीभ्रूणहत्या, महिलांचे खच्चीकरण, स्त्रियांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, मुली ह्या परक्याचे धन अशा विषयांवर विद्यार्थ्यांशी हितगुज केली.
स्त्री-पुरुष असमानता व त्याचे भविष्यात उद्भवणारे दुष्परिणाम याविषयी लक्ष वेधले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी.अंजने यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व पुस्तके भेट देऊन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.साईनाथ उमरीवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.व्ही.एन.रामटेके, प्रा.एम.के सोनवणे, डॉ.एस.एन.झोपे, प्रा.एस.बी पाटील, प्रा.एस.एस. साळुंके, प्रा.दिलीप सोनवणे, के.एस अवसरमल तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
फोटोत मार्गदर्शन करतांना :- 1) डॉ. राजेंद्र फडके व्यासपीठावर प्रा.एस.पी.उमरीवाड, प्रा.व्ही.एन.रामटेके, प्रा.एम.के.सोनवणे, प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने, प्रा.डॉ. जतीनकुमार मेढे.
2) उपस्थित विद्यार्थी.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा