Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त भोईराज भवन, शहादा येथे दि. 9 फेब्रूवारी रोजी जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले



राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त भोईराज भवन, शहादा येथे दि. 9 फेब्रूवारी रोजी जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमीचे पूजन , आई जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन , संत शिरोमणी भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले , 

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. जयवंत मोरे होते, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी तसेच कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती पोलीस उपविभागीय अधिकारी,पुंडलिक सपकाळे साहेब यांची उपस्थिती होती जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे , जिल्हा सचिव प्रा. मोहन मोरे, नगरसेवक संजय साठे, जिल्हा युवाध्यक्ष महेंद्र बोरदे, अशोक शिवदे, सुपडू खेडकर , जयंतीलाल खेडकर, दादाजी जगदेव, तालुकाध्यक्ष नरेंद्र वाडीले, चूडामण सूर्यवंशी, छोटू वाडीले,राहुल शिवदे, गुलाबराव सोनवणे , महादु मोरे, दिपक साटोटे, पमुभाऊ अग्रवाल, रूपेश जाधव, विजय चौधरी आदी. मान्यवर उपस्थित होते, 

अशा प्रकारचा कार्यक्रम शहादा येथील उपक्रम दरवर्षी घेत असतात तसेच मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी असा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो, तसेच ह्या वर्षीचा कार्यक्रम हा जिल्हास्तरीय घेण्यात आला कार्यक्रमात नृत्य आणि गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात ह्या स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातून तसेच गुजरात व्यारा येथील स्पर्धक आले होते,  ह्यामध्ये एकूण 51 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता त्यात , नृत्य आणि गीतगायन स्पर्धेमध्ये एकूण 12 स्पर्धक विजेते झाले, सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र देण्यात आले, सदर कार्यक्रमातील उर्वरित देणगी अनाथाश्रमातील अंध, अपंग, इ. साठी  देण्यात येणार आहे आणि नवीन जन्मलेल्या 3 कन्याचा सत्कार 3100 रुपयाची फिक्स डिपॉसीट देउन करण्यात आला ,कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा यांचा मुख्य उद्देश म्हणजे बेटी बचाओ - बेटी पढाओ असा आहे , 

तसेच जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमास अनमोल सहकार्य करणाऱ्या देणगी दात्यांचे सन्मानचिन्ह देऊन आयोजकांच्या हस्ते गौरविन्यात सन्मानित करण्यात आले, ह्या कार्यक्रमाचे आयोजन कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा चे अध्यक्ष मिलिंद वाडीले, उपाध्यक्ष राजा खेडकर, सचिव स्वप्निल मोरे, कोषाध्यक्ष धनेश्वर तामसे, संघटक किशोर मोरे, सल्लागार दादू वाडीले , सदस्य विलास मोरे, सुनिल मोरे , अविनाश मोरे, बाळा साठे, सागर वाडीले,विपुल मोरे,कल्पेश वाडीले, अविनाश वाडीले यांनी केले, तसेच पिंगाने येथील सुनिल वाडीले, आकाश निकवाडे, नितीन शिवदे, दिपक वाडीले, जितेंद्र वाडीले, भूषण भोई, दिनेश नुक्ते आदिंनी परिश्रम घेतले, व युवा कार्यकर्ते तसेच समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सी डी खेडकर व महेश साठे यांनी केले तर आभार राजा खेडकर सर यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध