Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
दहिवद गावांत उघड्यावर शौचालयांस बसल्यास ग्रा.पं.अधिनियमातील शिक्षेसह होणार रेशन कार्ड रद्द...लोकनियुक्त सरपंच दहिवद
दहिवद गावांत उघड्यावर शौचालयांस बसल्यास ग्रा.पं.अधिनियमातील शिक्षेसह होणार रेशन कार्ड रद्द...लोकनियुक्त सरपंच दहिवद
प्रतिनिधी:शिवाजी पारधी अमळनेर गटविकास अधिकारी यांनी दहिवद गांव शंभर टक्के हागणदारी
मुक्त झाले असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दहिवद हे गांव कायमस्वरूपी हागणदारी मुक्त
गांव राहण्यासाठी लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले
,उपसरपंच वैशाली माळी व ग्रामपंचायत सदस्य यांनी या उपक्रमात अजून शासकीय
नियमानुसार कडक अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे .
गावांत प्रसार व
प्रचार माध्यमांचा उपयोग करत गावातील लोकांना सूचित केले आहे. जो कोणी उघड्यावर शौचालयास बसेल त्याला शासन
नियमानुसार दंड ,कारावास व तसेच शासन आदेशांनुसार रेशन कार्ड योजनेचा लाभ रद्द करण्याची तजवीज
केली जाईल. यासाठी प्रसार माध्यमाचा वापर
करत दहिवद गांव हागणदारी मुक्त गांव म्हणून कायमस्वरूपी राहण्यासाठी विडा उचलला आहे.
दहिवद गांव तालुक्यातील
जी गांवे मोठे आहेत त्या गावांमधील एक गांव असून हागणदारी मुक्त झाल्याने तालुक्यात
एकच चर्चा आहे. तालुक्यातील जनतेला या गोष्टीवर विश्वास बसत नसून तालुक्यातील सर्वात
वादग्रस्त असलेल्या गावांत हे झाले तरी कसे ? हा देखील प्रश्न पडला आहे.
गावांतील जनतेचा
प्रतिसाद पाहता गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी गावाकडे विशेष लक्ष घालत सामाजिक
कार्यकर्ते पंकज पाटील यांच्या मागणी
नुसार सार्वजनिक शौचालयाचे महिला व पुरुषांसाठी पाच युनिट मंजूर केले आहेत. १४ वित्त आयोग मधील निधीचा वापर करत बंद पडलेल्या
शौचालयांचे पुनर्जीवन करण्याचे काम चालू
केले आहे. तालुक्यात सार्वजनिक शौचालयाचे रोल
मॉडेल दहिवद गांवी तयार करणार
असल्याचे पंकज पाटील यांनी सांगितले.
गांव हागणदारीमुक्त
करण्यासाठी दहिवद येथील ग्रा.पं.सदस्य सुनील पाटील ,बाळू पाटील ,रवींद्र माळी
,देवानंद बहारे ,शिवाजी सोनवणे ,भीमा गोसावी,माणिकराव भदाणे ,स्वच्छता दूत भागवत
पारधी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी
पुढाकार घेतला आहे . आजी माजी जि.प.सदस्य त्यांना या कामात मार्गदर्शन करत आहेत व
गांव कायमस्वरूपी हागणदारी मुक्त राहण्यासाठी प्रचार व प्रसार माध्यमांचा वापर
लोकनियुक्त सरपंच यांच्या आदेशानुसार केला
जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा