Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

अमळनेरातील व्यापाऱ्यावरील झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोघा तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश .,पोलिसांच्या या शोध कार्याचे होतेय कौतुक




अमळनेर:प्रतिनिधी:शहरातील व्यापाऱ्यावरील झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोघा तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे . हे आरोपी अवघ्या १९ ते २० वयोगटातील हे तरुण गुन्हेगारीत अडकत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . ३ रोजी रात्री पावणेअकरा वाजता बसंतलाल बितराई व अजय बितराई यांच्यावर दोघा अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून गोळीबार केला होता . या प्रकरणात एकाने दिशाभूल करून दोन तरुणांचा बदला घेण्यासाठी बनावट जामीन अर्ज दाखल केला होता . 

मात्र पोलिसांनी पर्यायी यंत्रणा कामाला लावून गोपनीय माहिती काढली असता बितराई यांच्या कैलास ट्रेडिंगच्या आजूबाजूला फिरणारे हे आरोपी असल्याची माहिती मिळाली, खुद्द पोलिस अधीक्षक आणि अप्पर पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती . तसेच आरोपींचा कसून शोध घेण्याचे आदेश दिले होते . 

त्यामुळे या आरोपींना अटक करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते .पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , हेडकॉन्स्टेबल बापू साळुखे , पोलीस नाईक शरद पाटील , पोलीस नाईक दीपक माळी , रवी पाटील व हितेश चिंचोरे यांनी निखिल कैलास पाटील ( वय १९ , रा . लासूर गल्ली , मांडळ ) याला ढेकू रोडवरील दीपकनगर येथून अटक केली तर योगेश श्याम दाभाडे ( वय २० , रा . पारधीवाडा , गांधलीपुरा ) याला त्याच्या घरातून अटक केली . 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार , योगेश हा सहा महिन्यांपूर्वी कैलास ट्रेडिंग कंपनी दुकानाच्या शेजारील हितेश ट्रेडिंग या दुकानात कामाला होता . तो काम सोडून बदलापूर , ठाणे येथे गेला होता . जानेवारी महिन्यात तो परत आला . १४ जानेवारी रोजी त्याने पाडसे येथील यात्रेत मध्यप्रदेशातील शेंधवा येथील एकाकडून गावठी पिस्तूल घेतली . महिनाभरापासून तो आणि निखिल याने कैलास ट्रेडिंगच्या आजूबाजूला पाळत ठेवली आणि संधी साधत ३ फेब्रुवारीच्या रात्री हल्ला करून
लुटण्याचा प्रयत्न केला होता . 

निखिल हा बारावीचा विद्यार्थी असल्याचे समजते . त्याचे वडील चालक असून तो अमळनेरात भाड्याने घर घेऊन राहत होता आरोपी निखिल याने कीर्तन करून लूटमारीचा सुरू केला नवा अध्याय या प्रकरणातील  घटना घडण्याचा अगोदर १५ दिवस पासून तो कीर्तन करीत असल्याची माहिती मिळाली आहे . त्यामुळे आपल्यावर कोणीही संशय घेऊ शकणार नाही असे त्याला वाटत होते .  ९ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता पोलिसांनी त्यांना अटक केली . आरोपी मिळाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशाने एलसीबी पोलीस निरीक्षक बी . जे . रोहम यांनी येथे येऊन आरोपींची चौकशी करून गुन्ह्यातील माहिती गोळा केली . दरम्यान , आरोपी नवखे असले तरी त्यांनी आणखी काही गुन्हे केले असण्याची व आणखी हत्यारे असण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी सांगितले .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध