Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

पातोंडा येथे श्री संत रविदास जयंती मोठ्या उत्सवात संपन्न .



पातोंडा:प्रतिनिधी:ऐसा चाहुं राज मै,जहां मिले सबन को अन्न, छोट - बडो सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न! हम भी चाम के,तुम भी चाम के, तुम भी चाम के, ये जग है चाम के सारा,बगैर चाम के कौन है जीव,कहते है रविदास चमारा!  मन चंगा तो कठोती मै गंगा अशा शांतीपूर्वक विचारांची गंगा आपल्या दोह्यातून सहाशेव्या दशकात अजरामर असलेलं जगविख्यात जगदगुरू श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची 643 वी जयंती मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढून समाजबांधवांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं. सदस्य यांनी प्रतिमेचे करून माल्यार्पण केले. नंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक विलास चव्हाण व सागर मोरे यांनी आपल्या मनोगतातून संत रवीदासांचे विचार व त्यांच्या कार्याची व्याप्ती समाजबांधवापुढे विशद केली. नंतर ट्रॅक्टरवर सुंदर अशी सजावट करून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी असंख्य महिला भगिनींनी प्रतिमेचे पूजन केले. तदनंतर सागर मोरे यांनी सर्व उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले. यावेळी काशीनाथ सोनवणे, शालीक सोनवणे, भास्कर सोनवणे, सुनील चित्ते, संजय महाले, घनश्याम पाटील,भगवान सोनवणे,राजू सोनवणे,गुलाब सोनवणे,भिकन सोनवणे,वना सोनवणे, राहुल मोतीराळे,सुखदेव सोनवणे,मोहन शेवाळे,तुळशीराम महाले,शंकर सोनवणे,संतोष सोनवणे,शरद सोनवणे,दत्तात्रय मोतीराळे, विनोद मोरे,महारु सोनवणे, नाना सोनवणे,रतीलाल सोनवणे, स्वप्नील सोनवणे व समस्त चर्मकार महिला व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व तरुण युवकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध