Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०
बोली भाषेसह मराठी भाषेचा विकास व्हावा प्रा.एस.बी.महाजन
रावेर दि. २७ (प्रतिनिधी) “ चाऊंन्ड राजे करवियले गंगराजे सुत्ताले करवियले ” या मराठीतील प्रथम ओळी महानुभाव पंथीय मुंकुंद राज यांनी श्रवण वेळगोळ केले आहे.भाषा हाव भावाची उंगली दर्शनाची शब्द व वाक्य यातुन अर्थ निर्मिती झाली.आज कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात साजरा करतांना ते बोलत होत. यावेळी सर्वप्रथम ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त कवि कुसुमाग्रज यांच्या जयंती मिनित्त त्यांच्या प्रतिमेस डॉ. प्रविण पवार यांनी पुष्पहार अर्पण केला तर डॉ. डिगंबर पाटील यांनी पुष्पपुजा व धुपपुजा केलली. या वेळी उपस्थितानी अभिवादन केले.
पुढे प्रा.महाजन म्हणाले की,या भाषेला मोगल काळात उर्दु भाषेत पेशवे काळात बखरी, शिवकाळात लावणी व पोवाळे शब्दकोष यातुन भाषा फोफावत गेली व राज दरबाराची भाषा बनली. प्रयत्न केला गेला म्हणुन बोली भाषेचे महत्व कमी होऊ भाषा ज्ञानपिठ पुरस्कार कुसुमाग्रज यांच्या काळात मराठी भाषा ही राज असावी असा नये म्हणुन मराठी मधुन संवाद होणे मराठी भाषेतुन शिक्षण मिळणे व सर्व व्यवहार करते त्याच प्रमाणे बोलीभाषेसह मराठी भाषेचा विकास घडवून आणणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.
असे प्रतिपालन प्रा.एस.बी. महाजन यांनी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त व मराठी भाषा गौरव दिन डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व. वाचनालय व ग्रंथालयात मोठया उत्साहात साजरा करीत असतांना केले.
यावेळी कामगार नेते दिलीपजी कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश घेटे,
फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,कॉग्रेसचे कामगार जिल्हाध्यक्ष पंकजभाऊ वाघ, पी.आर.निळे, वाय.एस.पाटील,इकबाल काजी सर,सुनिल सुर्यवंशी, सम्यक इंगळे, नितीन तायडे,रमेश घेटे,दशरथ घेटे,ज्ञानेश्वर घेटे,विलास लहासे, यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ग्रंथपाल निलेश तायडे यानी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा