Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

ऐनपूर महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा.


प्रतिनिधी रावेर :कवी कुसमाग्रजांना अभिवादन.मराठी भाषेत तांत्रिक ज्ञान येणे आवश्यक प्रा.डॉ.रेखा पाटील.
मराठी बोलण्याची केली प्रतिज्ञा.

निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज जयंती - मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम दैनंदिन जीवनात व व्यावहारात मराठी बोलण्याची प्रतिज्ञा करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागातर्फे करण्यात आले. मराठी भाषा ही सर्वगुण संपन्न भाषा आहे असे मत प्रमुख वक्ते प्रा.एम.के.सोनवणे यांनी मांडले. मराठी भाषेचे महत्व विषद करीत असताना वैश्वीक साहित्य निर्मिती चे सामर्थ मराठीत आहे. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात मराठी विषय अनिवार्य करावा असे मत त्यांनी मांडले. प्रा.के.एल हेरोळे यांनी प्रत्यक्ष आलेले अनूभव कथन केले आणि दलित साहित्याने मराठी भाषेला समृद्ध केले असे मत मांडले.प्रा.दिलीप सोनवणे यांनी शासनाने प्रत्येक शाळेत मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला त्याचे कौतूक करत कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. 
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील यांनी नटसम्राट नाटकातील कावेरी पात्राचे उदाहरण देत शिरवाडकरांच्या नाटकांचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांमधून कु.धनश्री जगजीवन मोरे, कु.विद्या गणेश चौधरी यांनी मराठी भाषेचे प्रत्यक्ष अनूभव व महत्त्व सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्या डॉ.सौ.निता वाणी, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील, प्रा.एम.के सोनवणे, प्रा.के.एल.हेरोळे, प्रा.एस.पी.उमरीवाड, प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.वैशाली पाटील, प्रा.अर्जून वंजारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिलीप सोनवणे, सुत्रसंचालन विद्यार्थी प्रशिक तायडे याने केले तर आभार आफताब खान या विद्यार्थ्यांने मानले. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फोटोत :- 1)बोलतांना प्रा.एम.के सोनवणे व्यासपिठावर प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.वैशाली पाटील, प्रा.के.एल.हेरोळे, प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील, उपप्राचार्या डॉ.सौ.निता वाणी
2) अध्यक्षीय भाषण करतांना प्रा.डॉ.सौ रेखा पाटील व्यासपिठावर प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.वैशाली पाटील, प्रा.के.एल.हेरोळे, प्रा.एम.के.सोनवणे, उपप्राचार्या डॉ.सौ.निता वाणी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध