Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०
धुळे शहरात १६ फेब्रुवारी २०२० रोजी, १५ केंद्रांवर स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन
धुळे:प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात दि. १६ फेब्रुवारी २०२० रोजी पूर्व प्राथमिक इ.५वी व उच्च प्राथमिक इ.८ वी या वर्गासाठी आवेदन पत्र भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय स्तरावरून या परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे.
या परीक्षेच्या आयोजन, नियोजनासाठी शासनाने विदीत केलेल्या सुचनेनुसार परीक्षेचे आयोजन करण्यात
आले असून. धुळे शहरातील
उर्दू, मराठी व इंग्रजी माध्यमाचे
१५ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे १)ए.आय.टी.उर्दू शाळा,वडजाई रोड,धुळे
२) जयहिंद प्राथमिक शाळा देवपूर, धुळे
३)कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल, धुळे ४)छत्रपती शिवाजी हायस्कूल, धुळे ५) एस.एस.पी.दुधोडिया हायस्कूल, धुळे
६) नॅशनल उर्दू हायस्कूल, धुळे
७) टी.टी.के.महाजन हायस्कूल, धुळे ८) श्री.पिंपळादेवी हायस्कूल,धुळे ९) श्री.पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धुळे
१०) जयहिंद हायस्कूल, धुळे
११) एकविरा देवी प्राथमिक शाळा, धुळे
१२) गर्ल्स उर्दू प्राथमिक शाळा, मिल्लत नगर, धुळे
१३) जे.आर.सिटी. हायस्कूल, धुळे १४) के.सी.अजमेरा हायस्कूल, देवपूर धुळे
१५) कमलाबाई शंकर कन्या शाळा, धुळे
या शाळांचा समावेश करण्यात आलेला असुन. इ.५वी साठी १७१० विद्यार्थी प्रविष्ट असून इ.८ वी साठी
१४७४ विद्यार्थी प्रविष्ट झालेली आहेत. एका वर्गात २४ परीक्षार्थी असतील असे नियोजन परीक्षा केंद्रनिहाय करण्यात आलेले
आहे. सर्वात जास्त विद्यार्थी २३९ जे.आर.सिटी.हायस्कूल,धुळे येथे आहेत. या परीक्षेसाठी केंद्रसंचालक म्हणून १५ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तसेच साधारणत: प्राथमिक साठी ८२ व माध्यमिक साठी ७१ असे एकूण १५३ पर्यवेक्षकांची नियुक्ती करणेबाबत केंद्रसंचालक कार्यवाही करणार आहेत. सदर परीक्षा ही दि.१६ फ्रेबुवारी २०२० रोजी सकाळी ११.०० ते
१२.३० व दुपारी १.३० ते ३.०० या दरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षार्थीनी पेपरच्या आधी अर्धा तास परीक्षा केंद्रावर
उपस्थित राहणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. म.न.पा.मा.आयुक्त. एजाज शेख तसेच उपायुक्त. गणेश गिरी साो. यांनी सूत्रबध्द नियोजनाच्या सुचना दिलेल्या असून या परीक्षा केंद्रावर भेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी म.न.पा.शिक्षण मंडळात परीरक्षक दालन (कस्टडी ) निर्मिती करण्यात आले असून यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त शिक्षण मंडळाच्या येथे कार्यरत राहणार आहे.
या परीक्षेबाबत मा.आयुक्त महोदय व उपायुक्त महोदय, धुळे म.न.पा.धुळे यांनी सर्व परीक्षार्थी विद्यार्थी,
विद्यार्थीनी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. परीक्षेचे कामकाज सुत्रबध्दतेने होणेसाठी प्रशासन अधिकारी स्तरावरून पर्यवेक्षक,
लेखापाल, साधनव्यक्ती,
विषतज्ञ,विषयशिक्षक, संगणक ऑपरेटराचे सहकार्य मिळणार आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा