Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०
माजी आमदार कृषिभूषण यांचा वऱ्हाडी सावधानचा प्रसिद्धीपत्रकातून संदेश
शिवाजी पारधी : अमळनेर तालुक्यातील माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे नेहमीच
समाजाला अधोगती नेणाऱ्या चाली व प्रथा यांचा प्रखर विरोध करत असतात . त्यांच्या
सामाजिक व राजकीय जिवनात देखील त्या प्रथांच्या विरोधात स्वतः प्रत्यक्ष उतरत
अंमलात आणण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करतात. त्यामुळे ते नेहमीच तालुक्यात
चर्चेत असतात. असाच एक नवा उपक्रम त्यांनी लग्नसराईच्या घाई –गर्दीत जनतेसमोर
आणला आहे. तालुक्यातील जनतेला “वऱ्हाडी सावधान” चा संदेश
देत समाज जागृत करण्याचे काम केले आहे.आमदार असताना साहेबराव पाटील यांनी राजवड येथे कृषि मेळाव्याचे आयोजन करत एक नवा आदर्श समाजासमोर व राजकीय क्षेत्रात ठेवला होता.
साहेबराव पाटील यांचा वऱ्हाडी सावधान !... चा संदेश
आपल्याकडील बहुतेक लग्न बहुतांशी उन्हाळ्यातच होतात.लग्नाला
जात असतांना अपघातही होतात .कधी –कधी आपल्यातलेच काही म्हणतात नको तो प्रवास.हुंडा
देणे-घेणे कायद्याने गुन्हा तरीही आपण होतो त्याचे साक्षीदार. वरातीतील हिंडीस
प्रकार बेधुंद होवून बिघडते तरुणाई असे सर्व असतांना कृषिभूषण यांनी मात्र त्यांचे
दोन्ही मुलांचे लग्न अगदी साद्या पद्धतीने लावलेत चि.धीरेंद्र यांच्या लग्नाला
फक्त गावांतील सत्तर लोक होते तर विशालच्या लग्नात कुणालाच बोलवले नाही. पैसा आडका
व सर्व काही असतांना देखील त्यांनी आपल्या कृषिभूषण यांनी अत्यंत साद्या व सहज
पद्धतीने लग्न लावत एक आदर्श समाजासमोर ठेवला असून तोच संदेश ते संपूर्ण समाजाला
आजही देत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा