Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

पोलीस शिपाई पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याना संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची सुट....

पंकज पाटील (उपसंपादक)


राज्याच्या पोलीस दलातील “पोलीस शिपाई ” या पदाची शैक्षणिक अर्हता सन १९९३ पर्यंत ८ वी पास अशी होती. २५ नोव्हेंबर १९९३ च्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये वाढ करण्यात आली असून ती आता माध्यमिक शालांत परीक्षा अशी करण्यात आली आहे.सन १९९३ पुर्वी नियुक्ती झालेल्या पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता ८ वी पास अशी असल्याने ते महाराष्ट्र राज्य तंत्र मंडळामार्फत घेतल्या जाणऱ्या परीक्षेला बसू शकले नाहीत त्यामुळे त्यांना संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करता आलेले नाही.


महाराष्ट्र शासनच्या २०१९ च्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्याना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.बृहन्मुंबई पोलीस दलातील  जवळपास ४५००कर्मचारी निवृत्त झाले असून त्यांना संगणक अर्हता प्रमाणपत्र अभावी सातवा वेतन आयोग नुसार वेतन निश्चिती करण्यात आलेली नव्हती.या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबर १९९३ पुर्वी ज्या कर्माचारींची पोलीस शिपाई पदावर नियुक्ती झाली आहे अश्या पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या अधिपत्याखाली अंमलदाराना संगणक शैक्षणिक अर्हतेत सुट देण्यात आली आहे.या सूट मध्ये महाराष्ट्रातील सहायक पोलीस निरीक्षक -१२४५, पोलीस हवालदार लेखनिक -४४१,पोलीस हवालदार -६४०७,पोलीस नाईक -२२१५,पोलीस शिपाई -१०९ व सेवानिवृत्त -३४९२ असे एकूण १३९०९ लोकांना सातवा वेतन आयोगाचा लाभ होणार असून पोलीस दलामार्फत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध