Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

संत गोमाजी महाराजांची पालखी मुक्ताबाई यात्रेला रवाना शेगावात ठिकठिकाणी स्वागत..



शेगाव:प्रतिनिधी: श्री क्षेत्र गोमाजी महाराज संस्थान नागझरी येथील संत गोमाजी महाराजांची पालखि पाई वारी करीता दरवर्षि प्रमाणे यंदाही संत मुक्ताबाई यात्रे करीता चांगदेव मुक्ताबाई करीता आज शेगांव वरुन रवाना झाली

आज संत नगरी शेगांव येथील जुने  महादेव मंदिर लायब्ररी ये थुन सकाळी पालखिचे प्रस्थान झाले श्री पांडुरंगदादा पाटील यांच्या निवास्थानी पालखिचे स्वागत करण्यात आले त्यानंतर श्री धनंजयदादा पाटिल यांचे निवासस्थानी पालखिचे स्वागत झाले तसेच स्वातंत्रविर सावरकर मार्गातील बाळशास्त्रि जांभेकर न प मैदाना समोरील सुधा क्वार्टर येथील श्री वसंतराव कुळकर्णी यांचे निवास्थानी श्री गोमाजी महाराज पालखीचे स्वागत सुधाक्वार्टर रहीवाश्यांच्या वतीने करण्यात आले यावेळी शेगाव तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष नंदुभाऊ कुळकर्णी यांनी श्री संत गोमाजी महाराज पालखीचे पूजन केले. संपुर्ण परीसरात बगिनींनी रांगोळी काढली होती व परीसर सुशोभित केला होता पालखितील वारक-यांचे चहापान व शरबत देवुन स्वागत करण्यात आले यावेळी संस्थानचे अध्यक्ष धनंजयदादा पाटिल,पद्मनाभ पाटील,रत्नलाभ पाटील, हभप सोपान महाराज खोंड, उपस्थित होते पालखीचे स्वागत जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य  अनिल उंबरकार, श्री गुरुदेव गृपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कुकडे मनू कायंदे गजानन साठे गोपाल वर्मा , रामेश्वर राखोंडे पंजाबराव देशमुख व गोदावरी माता भजनी मंडळाने व रहिवायांनी केले भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध