Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

काळ कलियुगी आलाय



शीर्षक असं मला दयावं वाटलं कारण आज चोहीकडे खुप वाईट आणि तश्याच घटना नियमित वाचनात टीव्ही वर पाहण्यात  येतात. रोज काहीतरी अघटित मन सुन्न करणाऱ्या घटना कोण कसं कोणावर बलात्कार करेल नेम नाही. सर्व नातंच सम्पलें असं कधी वाटतं कुठं चिमुरडी, महिला, वृद्ध  वर बलात्कार तर भर रस्त्यावर जाळण ऍसिड फेकणे  कुठं लहान मुलानं वर पण अत्याचार.कुठं मतिमंद अंध अपंग वर सुद्धा काय म्हणावं याला. चोऱ्या माऱ्या दरोडा नित्याचंच.  

कुठं भाऊ भावाचा वैरी तर कुठं जगात आई सर्वोचं संस्कार देणारी माता राहिली नाही ती स्वतःच पाप झाकण्या साठी मुलाचा खुन करणारी कुठं मुलगा मातेस मारतो नातं हरवलं बऱ्याच ठिकाणी. स्रियांनं वर जितके अत्याचार होतात त्या खालोखाल लहान मुलांवर पण होतात. काही ठिकाणी तर नवऱ्या वर अत्याचार करणाऱ्या स्रिया पण  अवतरल्यात. 

तर महिलांना त्रास देणारे पुरुष पण आहेतच  कुठं शिक्षिका सुद्धा सुख मिळावं म्हणुन खेळवते  म्हणजे दुनियादारी विसरली काय दुनिया पाहावं तर पापच पाप भ्रष्टाचार कोण कसा पैसा खाईल नेम नाही काही भाषण इतकं छान देतात कि वाटतं देव माणुस असावा पण भाषण सम्पलें कि लीला दाखवतात. तसंच बुवाबाज भोंदु बाबा साऱ्याच पंथ धर्म मध्ये थोडी अशीं आहेत कि खरोखर ची साधु मंडळी त्यांच्या मुळे मान शरमेनं घालते ती उपाशी मरतात.. संध्याकाळी कीर्तन नंन्तर यांचा गोधळ सुरु...  खोटारडे पणा इतका वाढला  कि खरं कोण हे संशोधन करावं लागतं सारं भौतिक सुख आणि शरीर सुख वासने साठी....मला वाटतंय लोकं आता, "जसं ज्याचं कर्म तसं त्यास  फळ " हि ओळ विसरत चालली. पापी पाप करून मोकळा होतो पण ज्याच्यावर अन्याय झालेला असतो असते त्यांना भोगावं लागतं..करणारा शिक्षा भोगेल भोगतो त्याला त्याचं फळ मिळतंच पण निरपराध नाहक बळी पडतात त्याचं काय?  बरं असो हि सर्व पापी मंडळी आहेत.पापी दृष्ट लोकं आज मजा मारतांना दिसतात. पण त्यांना हे समजतं नाही रावणाची सोन्याची लंका सपंली कंस मारला गेला. असं म्हटलं जात पाप पुर्ण झालं घडा भरला कि काहीच राहात नाही.  

आज तसं खुप चांगली लोकं संस्कृती संस्कार पण आहेत आज सुद्धा म्हणूनच हि लोकं आहेत दृष्ट... आपण म्हणाल याला काही चांगलं दिसतंच नाही का तर होय अश्या वाईट घटना एखाद्या गावात कधीतरी घडतात. शहरात नियमित घडतं असतात एक घटना घडते पण बाकी शहर खुप छान चांगले असते... काही राजकारणी, समाजातील गुणी  स्त्री पुरुष, संत, कीर्तनकार अधिकारी थोडी  नव्हे बरीच चांगली आहेत. खरोखर गुणी लोकं आहेत आदर्श मानावे असे पुढे मानले जातील असे पण बोटावर मोजण्या इतके वाईट आहेत त्यांच्या मुळेच सारं सारे बदनाम होतात..  
चांगलं आणि वाईट नेहमी सोबत असतात. नाण्याच्या बाजु..तसंच भुतलावर असतं असं मला वाटतं....

पुर्वी देव होते तर राक्षस पण होते. जर देव मानत असाल तर राक्षस पण मानावाचं  लागेल.   नंन्तर सद्गुरू सद्गुणी माणसं झालीत तेव्हा माणसं होती तर भुत पिशाच पण होती.. तसंच माणुस मानत असाल तर भुत मान्य केलंच पाहिजे...पुर्वी माणसं भूतां च्या गोष्टी सांगत त्या आता लोकांना भ्रामक कल्पना वाटतात मग पूर्वीची गोष्टी सांगणारी पुर्वज खोटी होती का? तर नाही. 

अलीकडच्या काळात आता राक्षस, भुत पिशाच याची गरज उरली नाही सपंली  आणि खरचं  कुठच दिसतं पण नाही आणि तसं कोण बोललं तर लोकं आता  वेड्यात काढतील....असं म्हटलं जात देव देवळात नाही तर माणसात वसतो  तर राक्षस पण माणसात घर करून राहायला लागला आता. पूर्वीची माणसं स्वतःतील वाईट राक्षसी प्रवृत्ती कधीच जागृत होऊ देत नसतं सदाचारी होते.  काळ नुसार बदल म्हणुन खरोखर ची राक्षस भूत सपंली असावीत माणसात अवतरली.. आज चांगली  माणसं आहेत तितकीच वाईट  पण. जे कार्य राक्षस,  भुत, पिशाच करत होती ते कार्य काही माणसं  करू लागलीत.  कलियुगी काळ वाईट आलाय असंच...  

प्रदीप मनोहर पाटील 
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव.
पिन. 425108
मो. 9922239055



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध