Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे कामे तात्काळ थांबवा अन्यथा उपोषण करू: शिवसेनेचे निवेदन...
रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे कामे तात्काळ थांबवा अन्यथा उपोषण करू: शिवसेनेचे निवेदन...
प्रतिनिधी:बोदवड शहरात रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम करण्याअगोदर जीर्ण असलेल्या पाईपलाईन बदलवावी अन्यथा उपोषणाला बसू अशे निवेदन पुन्हा मुख्याधिकारी यांना शिवसेनेकडून दिले गेले.
शिवसेनेने दि. १७ फेब्रुवारी रोजी बोदवड शहरात रस्त्याने काँक्रीटीकरणाचे काम करण्याअगोदर जीर्ण असलेली पाईपलाईन बदलवावी अश्या मंगणीचे निवेदन दिले होते. परंतु त्यावर काही कारवाई करण्यात आली नसल्याने आज पुन्हा शिवसेनेच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की शहरातील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम तात्काळ थांबवून अगोदर जीर्ण झालेली पेयजल योजनेच्या पाईपलाईन चे काम अगोदर करण्याची मांगणी केली आहे.
जीर्ण झालेली पाईपलाईनचे काम न केल्यास काँक्रीटीकरण केल्याने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल व डागडुजी साठी शासनाला पुन्हा आर्थिक नियोजन करावे लागू शकते यासाठी तात्काळ काँक्रीटीकरणाचे काम थांबवून जीर्ण झालेली पाईपलाईन बदलवावी अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा शिवसेनेने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना दिले.
निवेदनावर शिवसेना अल्पसंख्याक उपजिल्हा प्रमुख कलीम शेख, नईम खान,गोपाळ पाटील,गणेश वाघ,मुजफ्फर शेख,प्रमोद धमोळे,अतिक शेख,अकरम शेख, हर्षल बडगुजर सह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा