Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०
“सुह्यदयी” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
महाराष्ट्र शासन साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य व साप्ताहिक विवेकचे उपसंपादक श्री रविंद्र गोळे यांनी लिहिलेल्या ‘सुह्यदयी’या पुस्तकाचे प्रकाशन यमगरवाडी ता.तुळजापूर येथे संपन्न झाले.
एकलव्य विद्या संकुल येथे महाशिवरात्र स्नेहमेळाव्यात आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी एकत्रीकरणात या पुस्तकाचे विशेष प्रकाशन करण्यात आले श्री.रविंद्र गोळे यांची आज पर्यंत ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत.
सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी पासून अलिप्त राहून निरलसपणे काम करणाऱ्या सहा व्यक्तींच्या जीवनकार्याचा परिचय त्यांनी या पुस्तकात करून दिला आहे.
यामध्ये ‘युनिस्को’या जागतिक संघटनेने दखल घेतलेल्या ‘पालावरची शाळा’या विषयाचे काम करणारे उमाकांत मिटकर, आदिवासी बांधवांसाठी अहर्निश झटणारे प्रमोद करंदीकर, सौर ऊर्जेसाठी काम करणाऱ्या सुनंदाताई पटवर्धन, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी काम करणारे रवींद्र कर्वे, वनवासी बांधवांना सन्मान देणारे पद्मश्री चैत्राम पवार,अध्यात्म क्षेत्रातील ह.भ.प.शिवाजी मोरे यांचा समावेश आहे
सदरील पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी श्री विवेक आयाचीत लेखक श्री रविंद्र गोळे,तपस्वी चॅरीटेबल ट्रस्टचे ॲड. मिलिंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा