Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०
महाशिवरात्री हिंदूचा पवित्र सणउत्सव... अल्काताई घाटे, आंबिवली-ठाणा
हिंदू बांधवांना एक पवित्र सण जो अतिशय भक्तीभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो, तो म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करुन भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करुन दुसरे दिवशी उपवास संपवतात.
शिवशंकर ! हम शरण तुम्हारे ।
तुम हो भक्तनके रखवाले ।।टेक।।
दूर पर्वत बीच, स्थान तुम्हारा ।
अखंड गिरती, जलकी धारा ।।
जो नर पूजा करे भक्तीसे ।
जनम-जनम के पाप सँहारे ।।१।।
शंख बजाये भक्तों का मेला ।
मुख से कहते हर-हर भोला ।।
सुजन हो या, कोई दुर्जन ।
तुम्हारा नाम सदा उच्चारे ।।२।।
सभी भक्तों का मेला देखा ।
उनसे भाव भक्तीही सिखा ।।
दास घुसरकर यही वर माँगे ।।३।।
महाशिवरात्री कथा
एक पारधी होता. तो शिकार करुनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला ते झाड बेलाचे होते आणि झाडाखाली शिवलिंग होते.
ते शिवलिंग पानाने बुजून गेले होते. पारध्याला झाडावरून सावज नीट दिसावे म्हणून तो झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकं ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण जलाशयावर पाणी पिण्यास आले. पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली, तो आता बाण सोडणार...तोच त्या हरिणाचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला की, हे पारध्या ! तू तर शिकारी आहेस. शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार. हे सुद्धा खरं आहे पण त्या आधी आमची एक विनंती ऐक आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो. आम्ही आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार खरं तर हाताशी आलेली शिकार जाऊ द्यायची कशी. पण त्या हरीणाच्या प्रमुखाने परत येण्याचं वचन दिलं आहे. तेव्हा शिकार करणारा पारधी म्हणाला, ठिक आहे. उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी तुम्ही आलं पाहिजे. हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली. आता येथे पुन्हा रात्र कशी काढायची. तोच दूर एका मंदिरातून घंटानाद ऐकू आला. मंदिरातून ॐ नमः शिवायचा जप त्याच्या कानावर पडत होता. पारध्याने ॐनमः शिवाय म्हटले. नकळतच त्याला या जपाची गोडी लागली. तो शिवाचे नाम घेऊन एक एक बेलाचे पाने तोडून खाली टाकत होता. त्याला काहीही माहिती नव्हती की खाली शिवपिंड आहे. त्याचे हातून ती शिवपूजा नकळतच घडत होती. तोच ते हरीण परत आले आणि म्हणाले, पारध्या ! आता बाण सोड. मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करुन आलो आहे मला आता मार. तेवढ्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली, त्याला नका मार मला मार. मला माझा पत्नी धर्म पाळू दे. तेवढयात लहान लहान हरीणाचे पाडसं समोर आली आणि पारध्याला म्हणाली, त्या दोघांना मारु नकोस. तू आम्हाला मार. ते आमचे आईवडील आहेत. आम्हाला आमचे पुत्र धर्म पाळू दे. आमच्या आईवडीलांचे रक्षण कर.
एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकांनी दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली. अन् पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात. तर मी का दयेचा धर्म पाळू नये. त्यांची शिकार करून पापाचा धनी का होऊ बरं. त्या पारध्याने सर्वांनाच जीवनदान दिले. पारध्याला शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्या सर्वांचाच उद्धार केला. बरं का नामस्मरण केल्याने मनुष्याची वृत्ती बदलते. पाप करु देत नाही म्हणूनच नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे.
सालबर्डी में मैने शिव का दर्शन कर लिया ।
भोलेभाले भावसे, भोलीभाली भक्तीसे ।।
सालबर्डी में मैने शिवका दर्शन कर लिया ।टेक।।
वह जगह देखने भयानक है ।
छाती करती है देख धक धक है ।।
दर्शन लेने को देर लगती है ।
भक्तशिव पर सभी आशिक ।।१।।
बात भाती नही किसको डर की ।
देख के झूंड वह नारी नर की ।।
नहर नदियाॕ उचे पहाडो मे ।
गूंज उठती आवाज हर हर की ।।२।।
महाशिवरात्री का लगता है मेला ।
भक्त कहते सभी हर हर बोला ।।
दास घुसरकर प्रे से बोले ।
कही भी जाकर बैठता भोला ।।३।।
शिव या शद्बाचा अर्थ मंगलमय आणि कल्याणा स्वरुप असा आहे. हिंदू धर्मातील देवी देवता प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आनंद आणि शांतीमिळावी यासाठी शक्ती देतात पण यासाठी आपण नामस्मरण व उपासना करणे गरजेचे आहे. भगवान शिवाला "भोळा शंकर" देखील म्हटले आहे. त्याची भक्तीभावे उपासना केल्यावर त्वरीत प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव आहे. शिवकृपा प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर ॐनमःशिवाय हा जप करायला हवा. !
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा