Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

चाकडू ग्रामपंचायतीत अपहाराची मालिका सुरूच,भ्रष्टाचाराला राजकीय पाठबळ




शिरपुर प्रतिनिधी - शिरपुर तालुक्यात मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायत कारभारात भ्रष्टाचाराच्या तक्रारीत वाढवत असून आत्तापर्यंत लाखोंनी करोडोंच्या रुपयात तक्रारी दाखल होऊन अनेकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत 
मात्र तरीदेखील तालुक्यातील ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचे मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. मागील काळात ग्रामपंचायत  चाकडू मध्ये ६७ लाखांचा अपहार झाला होता, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असताना आता पुन्हा या ग्रामपंचायत ४२ लाखांच्या अपहार समोर आला आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी  की अधिकारी ग्रामपंचायत हे चाकडू गावात दप्तर तपासणीसाठी गेले असता ग्रामपंचायतीने अनेक प्रकारचे अभिलेख त्यांना चौकशीसाठी उपलब्ध करून दिले नाहीत, याबाबत सखोल चौकशी केली असता प्रकरणातील आरोपी सरपंच ठुमाबाई सुक्राम मुखेड व विद्यमान ग्रामसेवक अमोल भदाणे यांच्या कार्यकाळात १४ वा वित्त आयोग, पैसा, ग्रामनिधी इत्यादी योजनांच्या माध्यमातून कोणतेही कामे न करता जवळपास ४२ लाख ४२ हजार ती रक्कम अपहार झाला असल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत ग्रामपंचायत विभागाने सविस्तर चौकशी करून अहवाल जिल्हा परिषद कार्यालयात सादर केला असून यातील दोषींवर आर्थिक अपहार करणे या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रस्तावित करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे  वारंवार अशाप्रकारचे भ्रष्टाचार करून अपहार करण्यात ही मंडळी अजिबात बजावत नाही याचे कारण म्हणजे यांना मिळणारा राजकीय राजाश्रय आहे अशी चर्चा पंचायत समितीचे वर्तुळात रंगली आहे. राजकीय समर्थक म्हणून  यांना राजकीय राजाश्रय मिळतो आम्ही यांच्यावरील कार्यवाहीची धार कमी करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जातो आणि म्हणून अधिकारी ना अशा प्रकारांमध्ये कठोर कारवाई  करताना अडचणी निर्माण होतात. व त्यांच्यावर राजकीय दबाव निर्माण  केला जातो.

सदर-सरपंच यांच्याविरोधात मागील प्रकरणात  शिस्तभंगाची अपील सुरू  असून  जिल्हा परिषद आणि विभागीय कार्यालयाने यांच्यावर कारवाई प्रस्तावित केलेली असताना  राजकीय दबाव आणून या अपिलाला स्थगिती मिळवण्याच्या  चर्चा देखील  रंगल्या आहेत व असे स्थगिती देण्याचे पत्र निर्भीड विचार च्या हाती लागले आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी पदाधिकारी यांच्या राजकीय बोलवता धनी कोण ? याबाबत उलट-सुलट चर्चांना वेळ आला आहे.त्या‘मुळे मोठे  राजकीय पदाधिकारीच जर भ्रष्ट्राचाराला खत पाणी घालत असतील तर म ग न्यायाची अपेक्षा तरी कोणा कडून करायची हा प्रश्न निर्माण  झाला आहे.

चाकडू ग्रामस्थांनी देखील  दिनांक १७रोजी  गटविकास अधिकारी शिरपूर यांना निवेदन दिले आहे की  चाकडू ग्रामपंचायत  मधील  अपहार करणाऱया सरपंच व ग्रामसेवक यांची सविस्तर चौकशी करून  रक्कम निर्धारित करण्यात यावी, यानुसार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे शिवाय पंधरा दिवसाच्या आत गुन्हे दाखल न झाल्यास  चाकडू ग्रामस्थांनी  आ‘रण उपोषणाचा इशारा दिला आहे  या पत्रावर  ग्रामपंचायत सदस्य गावकारीणी  सह्या  केल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध