Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमळनेर रिडर्स असोसिएशनच्या वतीने पहिल्यांदाच रंगणार ‛ वाचनसंध्या ’ कार्यक्रम ! अमळनेरकर रसिकांसाठी शुक्रवारी वाचनसंध्या कार्यक्रमाची पर्वणी ! अमळनेर रिडर्स असोसिएशनतर्फे अनोखे आयोजन !
अमळनेर रिडर्स असोसिएशनच्या वतीने पहिल्यांदाच रंगणार ‛ वाचनसंध्या ’ कार्यक्रम ! अमळनेरकर रसिकांसाठी शुक्रवारी वाचनसंध्या कार्यक्रमाची पर्वणी ! अमळनेर रिडर्स असोसिएशनतर्फे अनोखे आयोजन !
अमळनेर:प्रतिनिधी:अमळनेर रिडर्स असोसिएशन व पु. साने गुरुजी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 रोजी या“वाचनसंध्या ”हा आगळावेगळा साहित्यिक कार्यक्रम अमळनेरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला आहे . या ‛ वाचनसंध्या ’ कार्यक्रमात ‛ कथा अभिवाचन , साहित्य चर्चा व साहित्य प्रश्नमंजुषेची गुंफण असलेली वैचारिक मैफिल रसिकांसमोर सादर होणार आहे .
अमळनेर शहरातील सानेगुरुजी ग्रंथालयाच्या सभागृहात शुक्रवारी दि. 21 रोजी , दुपारी ठीक . ४ वाजता आयोजित या कार्यक्रमास सर्व अमळनेरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन आयोजक मेघागौरी घोडके, निखिल बैसाने, युवावक्ता सारांश सोनार, उदयकुमार खैरनार, स्वनिल चव्हाण, कृष्णा संदानशीव, भोजराज पाटील, गुंजन क्षीरसागर, विवेक अहिरे, योगेश संदानशिव, पूजा सुरसुरे , प्राजक्ता शुक्ला, कुणाल शिरुडकर , प्रशांत शिंदे , ज्योति वानखेड़े ,अमोल संदानशीव, हर्षदा पाटील, सोनिया भावसार, तन्मय पाटील आदी सदस्यांनी केले आहे .
अमळनेरातील पुस्तकप्रेमी मंडळींचा ‛ अमळनेर रिडर्स असोसिएशन ’ हा वैचारिक नाविन्यपूर्ण उपक्रम वर्षभरापासून सुरू आहे . याच माध्यमातून होणाऱ्या ह्या वाचनसंध्येला सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व या उपक्रमात सहभागी होऊन वाचन चळवळीस पाठबळ द्यावे , असेही आवाहन सर्व आयोजकांनी करण्यात आले आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा