Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०
चोपडा येथील आदिवासी मुलांच्या वस्तीगृहासमोर घाणीचे साम्राज्य
पंकज पाटील(उपसंपादक)
चोपडा येथे महाराष्ट्र शासनाचे शासकीय आदिवासी मुलांचे नविन वसतिगृह चोपडा धनवाडी रस्त्यावर
आहे. वसतिगृहासमोर आजूबाजूला असलेल्या वस्तीतील घरांचे सांडपाणी सर्रास सोडण्यात
आले असून आदिवासी मुलांच्या आरोग्याविषयी खेळ केला जात असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र शासनकडून
आदिवासी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजणा शासन स्तरावरून राबविल्या जात
असतात .त्या योजना खऱ्या अर्थाने त्या मुलांपर्यंत कधी पोहचतच नाहीत. त्याचेच हे
जिवंत उदाहरण असून या इमारतीचे बांधकाम झाल्यापासून ते आजतागायत त्यासमोर सर्रास
सांडपाणी सोडले गेले आहे. त्याकडे आदिवासी विभागाचे प्रकल्प प्रमुख व चोपडा
नगरपालिकेचे देखील दुर्लक्ष असल्याचे वसतिगृहातील मुलांनी तरुण गर्जना टीमशी
बोलताना सांगितले. आदिवासी मुलांच्या नावाने सर्वांचीच लुट चालू असून भोजन व्यवस्थेत देखील त्रुटी व उणीवा आहेत
.याप्रकरणात ठेकेदार व प्रशासनातील
नियंत्रण अधिकारी यांची मिलीभगत असल्याचे दिसून आले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा