Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती निमित्त शोभा यात्रा लेगी नृत्य बंजारा फाग मिरवणुकीने बंजारा संस्कृतीचे झाले दर्शन
रावेर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती निमित्त शोभा यात्रा लेगी नृत्य बंजारा फाग मिरवणुकीने बंजारा संस्कृतीचे झाले दर्शन
प्रतिनिधी:रावेर दि 15।02।2020रोजी बंजारा समाजाचे आराध्य संत सेवालाल महाराज यांची 281 वि जयंती निमित्त प्रत्येक तांड्यातून रावेर पर्यंत बाईक रॅलीद्वारे रावेर शहरात दाखल होऊन शोभा यात्रा रावेर शहरात काढण्यात आली
ही शोभा यात्रा पाराचा गणपती ची पूजा करून तेथूनच सुरवात करण्यात आली शोभा यात्रा सकाळी 11वाजेपासून सुरवात करन्यात आली रथ पालकी सेवालाल महाराज यांचा सजीव देखावा ढोल पथक,बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य लेगी नृत्य,फाग ,कळसधारी महिला बंजारा पोशाख मिरवणुकित रावेर शहरात विशेष आकर्षित ठरले। ,संत सेवालाल जयघोषाने तरुण मंडळी थिरकली,व सपूर्ण रावेर शहर
मिरवणूक पाराचा गणपती हेडगेवार चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ,तर तहसीलदार कार्यालयाजवळ संत सेवालाल महाराज यांची प्रतिमा पूजन मुलीच्या हस्ते पूजन करून बेटी बचाव बेटी पढाव चा संदेश देऊन मिरवणूकीचा समारोप करण्यात आला मीरवणुकीत शिस्तीचे दर्शन
या मिरवणुकीत कोणतेही प्रकारचे डीजे न लावता पारंपरिक वाद्य ढोल ताशे व लेगी नृत्य,आणि कतार बद्ध मिरवणूक काढण्यात आली तसेच
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक पुढे घेण्यात आली पाल लालमाती ,गुलाबवाडी, जुनोदे तांडा,अभोडा,जिंसी तांडा,लोहार केराळा तांडा,कुसुबा,व रावेर येथील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने शामिल झाले
त्याच बरोबर रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे तहसिलदार उशाराणी देवगुणे,सामाजिक कार्यकर्ते डी डी वाणी शोभा यात्रेत सहभागी होऊन संत सेवालाल जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या
राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना रावेर बंजारा कर्मचारी संघटना बंजारा सेना, बंजारा युवा मंच जुनोदे व समस्त बंजारा समाज बांधवानी परिश्रम घेतले रावेर पोलिसानि चोख बंदोबस्त ठेवला होता
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा