Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांची धडक कामगिरी शेतक-याचा कापुस चोरी करणारे जेरबंद




काही दिवसांपूर्वी कुसुम्बा येथिल गजानन दगडू इंगळे यांच्या शेतातील
शेतकरीचे कावठी शिवारातील शेतातील घरात भरुन ठेवलेला
कापुस,हरभरा,बाजरी,भुईमुगच्या शेगा, असे एकुण ६९०००/- रुपये किंमतीचे धान्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेले होता या घटनेची नोंद
सोनगीर पोलीस ठाणे भाग ५ गुरनं.१६२/२०१९ भादवी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल करण्यात आला होता या गुन्हयाचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी बुधवंत यांच्या कडे चालू असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगार 

१) भिका सदु भोई रा.लोढा नाला अकलाड ता.जि.धुळे व त्याचा साथीदार 
२) अशोक गोमा अहिरे रा.अकलाड ता.जि.धुळे यांना ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून सदर गुन्हयातील मुद्देमाल आरोपी कडुन हस्तगत करण्यात आला आहे व गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे सदर आरोपीन कडुन बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील, सपोनि श्री. उमेश बोरसे, पो.स.ई श्री. आनिल पाटील, पो.हे.कॉ, सुनिल विचुरकर, पो.हे.कॉ. संजय पाटील, पो.हे.कॉ. संदिप थोरात, पो.ना. वसंत पाटील, पो.कॉ. चेतन कंखरे, पो.का. मनोज पाटील, पो.कॉ. किशोर पाटील, पो.कॉ. योगेश जगताप, पो.कॉ. दिपक पाटील, पो.कॉ. विलास पाटील, पो.कॉ गुलाब पाटील, पो.कॉ. केतन पाटील यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध