Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

देशात विध्वंस निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या माजी आमदार. वारीस पठाणावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा - भारतीय जनता पार्टी




धुळे:प्रतिनिधी:सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत.ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी एका सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. 

आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप, मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी आमदार. वारीस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून बोलले, आपण १५ कोटी आहोत, पण १०० कोटीला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट! अशा इशारा दिल्यानंतर. 

धुळे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटली असुन. असे विधान करून देशात विध्वंस निर्माण करणारे व दोन धर्मियात तेठ निर्माण करुन देशांची शांतता व सुरक्षितता धोक्यात आणनाऱ्या एम. आय. एम. चे वारीस पठाना वर देशद्रोहाचा गुन्हा त्वरित दाखल करावा. जेणे करून पुन्हा कुणी अशी हिंमत करणार नाही. अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली या वेळी पठाण यांच्या प्रतीकात्मक  पुतळ्यास चप्पल मारून निषेध करण्यात आला नंतर जाळण्याचा प्रयत्न करत अस्ताना पोलीसांनी हस्तक्षेप करून पुतळा ताब्यात घेतला आंदोलकांनी पठाण यांचे पोस्टर जाळुन निषेध करण्यात आला या वेळी भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष. अनुप अग्रवाल,  हिरामण गवळी, युवराज पाटील, यश कदमबांडे, शशि मोगलाईकर, सचिन शेवतकर, उप. महापौर. कल्याणी अंपळकर,जयश्री अहिरराव, अमृता पाटील, किर्ती वराडे, प्रतीभा चौधरी, रत्ना बडगुजर आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध