Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०
प्रत्येक वेळी आमचाच बळी का..? श्री अर्जुनभोई मुंबई_
राज्यातील भोई समाज घटकाला किंमतच उरली नाही का? जो उठतो तो आपल्या परिने आमच्या समाजाच्या बाबत मत प्रकट करतांना, मांडताना दिसतो. कोणी आम्हाला पालखीचे हमाल म्हणून राज्याच्या समोर ठेवतो, कोणी पञकारीतेतुन जास्तीत जास्त दिवस अनुभव घेत असतांना ही वृत्तपञाच्या माध्यमातून आम्हाला पालखीचे डँम्बीसभोई म्हणून आमचा उल्लेख करतो राज्यातील हीच का आमची शोकांतिका? आणि ती सातत्याने होऊ पहात आहे का? अशा बाबीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यावर उचित कार्यवाही व्हावी ही मांडणी ही करतो. आमचा समाज आजही समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे याचा अर्थ असा नाही की, आम्ही आमचा संपूर्ण आत्मसन्मान गुंडाळून ठेवला आहे.
रूग्णालये जगवावीत, रूग्णालयांबरोबर माणसेही जगवावीत या मतांशी मी कायम सहमतच राहील परंतु प्रत्येक वेळेला आमचाच बळी का..? देशभरातल्या अनेक समस्या असतील ही परंतु निदान महाराष्ट्रातल्या भोई तत्सम समाज घटकांच्या समस्या ही पाहून त्यांना योग्य जगण्याची दिशा दिली असती तर... काही रूपये आमच्या वरही खर्च करुन आमचे दारिद्र्य कमी केले असते तर किती बरे झाले असते... राज्यातील आमच्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार देऊन त्यांना पोटासाठी भाकरी दिली असती तर ...अंग झाकायला कपडा देऊन आमची नदी तलाव तळीवरील फाटकी अवस्था झाकली असती तर... आणि राज्यात डोक्यावर छप्पर देऊन त्यांना मायेची ऊब दिली असती तर... त्यातुन आमच्याच राज्यातील आमचे सामाजिक दारीद्र्य काही प्रमाणात कमी झालं असते।। कब तक करेंगे औरोंकी गुलामी और कब तक करेंगे खुदकी निलामी... अभी तो जाग जाओ..जरा भावनिक होवुन जगण्यापेक्षा समाजपातळीवर एकतेच्या विचार मंथनातून भवितव्याकडे तरी बघु या... तुमच्या एकतेतुन तुमच्याकडे कोणी वाकडी नजर ही करण्याचा प्रयत्न करणार नाही.. नाही तर काही ठिकाणी काहींच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आप आपसातील वादातच गेलं आमचं आता पर्यंतच आयुष्य सारं... जरा निस्वार्थाने ध्येय्य गाठु या... आणि करु या भोई तत्सम जमाती समाजघटकांच्या एकतेचा जागर... आणि तोही फक्त आपल्या मुलांच्या हक्कासाठी आणि राज्यातील इतर समाजाच्या पुढे आपल्या ही दबदबासाठी... जय भोईराज
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा