Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

औरंगाबाद येथील भोई समाज एकत्रीकरण बैठक म्हणजे आशेचा किरण : रोहितभाऊ शिंगाणे



धुळे :प्रतिनिधी:औरंगाबाद येथे 16 फेब्रुवारीला एकत्रीकरण बैठक होते आहे. एक वर्ष पुर्वी पण एकत्रीकरण बैठक घेऊन औरंगाबाद टीम ने खरंच कौतुकास्पद कामगिरी केली होती.  एकत्रीकरण ची मशाल औरंगाबाद मध्ये नक्कीच पेटलेली आहे. 

परंतु 2017 मध्ये एकत्रीकरण ची सुरुवात आणि ठिणगी जळगाव च्या प्रथम आरक्षण बैठकीत झाली होती,  त्याचे श्रेय जळगाव चे यशवंत भाऊ,  महारू भाऊ आणि संपूर्ण जळगाव टीम चे आहे. या एकत्रीकरण ला आरक्षण बैठक मधुनच सुरुवात जळगाव येथील बैठक मध्ये झाली.  नंतर धुळे येथील बैठक भिलेशभाऊ खेडकर व रोहितभाऊ शिंगाणे यांनी आयोजित केली , त्यानंतर नाशिक ला आरक्षण बैठक साठी गणेशजी सपकाळ, खैरमोडेजी,तुषारजी वगैरे टीम ने मेहनत घेतली आणि ह्या लहान लहान ठिणग्या औरंगाबादेत मशाल बनल्या त्यासाठी योगेश भाऊ,नेमाडे भाऊ, शंकरराव जी यांनी स्तुत्य कामगिरी केली. त्यातच गजानन दादा साटोटे ,लोणारे साहेब आणि काटकर साहेब यांचे फारच महत्वपूर्ण योगदान लाभले.  त्यात तमखाने साहेब,  ए के भोई सर,  एस ए भोई सर,  सुपडुभाऊ, कांबळे जी ,मोरे साहेब, बोरदे भाऊ,  डाॅ  सोमनाथ सर, तुषार सर,भोई सर,शिवदे भाऊ,वाडीले साहेब,  शिंगाणे सर, गरगडे भाऊ,देविदास साहेब आणि अनेक समाजबांधव या कामगिरीसाठी सरसावले. धुळे जिल्ह्यात देखील समाज एकजुट साठी शिरपूर चे सुभाष भाऊ भोई आणि संतोषभाऊ भोई हे सदैव साथ देत असल्याचे दिसते.  

आता औरंगाबाद बैठक ला गजानन दादा,  लोणारे साहेब आणि बावने साहेब एकाच मंचवर येत आहेत, तसेच काटकर साहेब,  गणेश बापू , मोरे साहेब, सुपडूभाऊ, भिलेशभाऊ, लक्ष्मण भाऊ,  आणि इतर भोई सर्व संघटना एकत्र आल्या तर याहून आनंदाचा क्षण तो काय? 

तरी या बैठकीस समाजबांधव जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहतील आणि या एकत्रीकरण साठी खारीचा वाटा उचलतील. 

समाज नेहमीच लहान लहान शाखा,  दल आणि संघटना यात वाटला गेला आणि तू मोठा की मी यात दूरावला गेला. आता या बैठकीत विचारमंथन होऊन समाजाने मनोमिलन घडवून आणावे व नेत्यांनी देखील समाजाचे हीत जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी गरज आता निर्माण झाली आहे. 

आपणा सर्वांच्या सोबत असण्याने समाज उन्नती नक्कीच साधणार आहे.  जेथे जेथे समाजासाठी चांगले काम होणार असेल,  तेथे माझा नेहमीच पाठींबा असणार. या एकत्रीकरण बैठकीत चांगले विचारमंथन घडो आणि समाजाला एक नवीन आशेचा किरण मिळो अशी सदिच्छा! 

रोहितभाऊ शिंगाणे, धुळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भोई समाज सेना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध