Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०
भाजपाचे प्रदेश अधिवेशनाला अपेक्षितांनी उपस्थित राहावे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी
शिरपूर:प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टीची राज्य परिषदेची बैठक दि. 16 फेब्रुवारी 2020 रविवार रोजी नवी मुंबईत भाजपा राष्टीय अध्यक्ष श्री. जगतप्रकाश नड्डा यांचा प्रमुख उपस्थित व प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांचा अध्यक्षतेखाली व विधानसभा विरोधी पक्षनेते ना. श्री. देवेंद्र फडणवीस, विधान परिषेद विरोधी पक्षनेता ना. श्री. प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत रहेजा युनिव्हर्सल, एमआयडीसी, सायन- पनवेल महामार्ग, नेरूळ, नवी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
सदर राज्य परिषदेसाठी खालील प्रमाणे धुळे ग्रामिण जिल्ह्यातील पदाधिकारी अपेक्षित आहे. खासदार, आमदार, राष्टीय परिषद, राज्य परिषद सदस्य, जिल्हा पदाधिकारी, विविध आघाडी व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस, धुळे ग्रामिण जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, विविध आघाडी, मोर्चा, प्रकोष्ठ प्रदेश पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विस्तारक लोकसभा, विधानसभा अपेक्षित पदाधिकाऱ्यांनी नमूद ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन बबनराव चौधरी जिल्हाध्यक्ष भाजपा धुळे ग्रामिण यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा