Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

जळगांव जिल्हात तेलाच्या टाक्या चोरुन धुमाकुळ घालणा-या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी केले गजाआड



धुळे:प्रतिनिधी:जळगांव जिल्हयातील पहुर येथे दिनांक १७/०२/२०२० रोजी रात्री व नसिराबाद येथे दिनांक १८/०२/२०२० च्या रात्री पिकअप वाहनाने येवुन तेल व्यापा-यांच्या तेलाच्या टाक्या चोरीला गेल्याबाबत माहिती पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना मिळाल्यावरुन सदर चोरी बाबत कसुन चौकशी करण्याचे व गुन्हा उघड करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व कर्मचारी यांना पो.नि. शिवाजी बुधवंत यांनी सुचना व मार्गदर्शन केले वरुन सदर टीम ने बातमीन्दारा मार्फतीने व तांत्रिक मदतीने आरोपी व गुन्हात वापरलेले वाहन एच १८ ए ए ३४५५ या क्रमांकाचे असुन सदर वाहन हे धुळयातीत असल्याचे निष्पन्न झाले आहेत त्यावरुन सदर वाहना बाबत गोपनीय माहिती काढली असता सदर वाहन हे संशयीत आरोपी नामे 

१) हमीद हुसेन ऊर्फ नाटया आशिक हुसेन अन्सारी रा आझादनगर मारोती मंदीरा जवळ 
२) निसार शहा अरमान शहा कबीरगंज धुळे
यांनी वापरल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदर ची चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेले तेलाचे ३ ड्रम सुमारे ७०,०००/- रु किंमतीचे व चोरीत वापरलेले अशोक लेलंड पिकअप वाहन एम एच १८ ए ए ३४५५ किंमत २,५०,०००/- रु असा ३,२०,०००/- रुपयाचा मुददेमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे. व अपर पोलीस अधीक्षक श्री डॉ.राजु भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील स.पो.नि.उमेश बोरसे, पोसई. हनुमान उगले, पोसई. अनिल पाटील, पोहेकॉ  रफिक पठाण, संदिप थोरात, सुनील विंचुरकर, पोना. प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, पोकॉ. राहुल सानप, तुषार पारधी, कुणाल पानपाटील, उमेश पवार, केतन पाटील, यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध