Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

दहिवद येथे जि.प. मराठी शाळेच्या दुरस्ती कामाचा शुभारंभ



शिवाजी पारधी : अमळनेर  दहिवद येथे १४ वित्त आयोगातून जिल्हा परिषद  मराठी शाळेच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले , उपसरपंच वैशाली माळी  ,ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आला .दहिवद येथील सुपुत्र जयवंत पाटील (झी २४ तास वृत्त वाहिनीत कार्यरत ) यांच्या मार्गदर्शनाखाली  शाळेच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते .विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेची संपूर्ण इमारत ही इंग्रजांच्या काळातील असून ती कौलारू आहे . कौलारू शाळा हि पत्तराचे छत टाकून करण्याचा कट गावांतील पुढाऱ्यांनी केला होता पण जयवंत पाटील यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गावांतील सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांनी ग्रामसभेत कौलारू छताची परवानगी घेत बहुमताने ठराव मंजूर करून घेतला . सततच्या पाठपुराव्यानंतर आज त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.




दुरुस्तीच्या कामांत शाळेचे  जुने कौल काढून संपूर्ण कौल नवीन टाकणे .कौलच्या खाली प्लायवूड,त्याच्या खाली असलेल्या जीर्ण झालेल्या दांड्या बदलवून ऑईल पेंट कलर मारणे ,शाळेच्या भिंतीना आतून बाहेरून प्लास्टर ,आतून क्लस्टर कलर बाहेरून सिमेंट कलर ,तळाला मार्गोनेट खरबडीत फरशी अश्या प्रकारचे संपूर्ण सेवा-सुविधांसह असलेली जिल्हा परिषद  शाळेची  दहिवद गावांत कौलारू इमारत  उभी राहणार  आहे. जळगांव जिल्ह्यातील दहिवद गावांतील अश्या प्रकारे दुरुस्त होणारी हि एकमेव शाळा असणार असून या इमारतीसाठी दहिवद गावांत १४ वित्त आयोगातून १२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्या कामाचा शुभारंभ आज मान्यवरांसोबत करण्यात आला. दहिवद गावांतील कष्टकरी ,शेतकरी कुटुंबातील सर्व सामान्य लोक समाधान व्यक्त करत आहेत .


याप्रसंगी माजी जि.प.सदस्य अशोक देसले, आबासो भाऊराव पाटील,  ग्रा.पंचायत सदस्य सुनील पाटील,बाळू पाटील, राजेंद्र देसले ,संजय देसले ,ज्ञानेश्वर देसले,सुकलाल पारधी ,राजू चव्हाण ,श्याम देसले,अशोक वकील, प्रशांत माळी ,भीमा गोसावी ,शिवाजी सोनवणे,सोनू धनगर ,कल्पेश पवार,छोटू देसले ,ग्रामसेवक संजीव सैंदाणे ,रेशन दुकानदार प्रविण गोसावी ,भागवत पाटील, ठेकेदार अमोल पाटील उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध