Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०
भोंगर्या बाजाराच्या तयारीत आदिवासी बांधव व्यस्त
सत्रासेन:प्रतिनिधी: सत्रासेन ता चोपडा: सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये तसेच मध्य प्रदेशातील वरला,बलवाडी, सेंधवा तसेच महाराष्ट्रातील चोपडा तालुक्यातील वैजापूर,उमरटी व शिरपूर तालुक्यातील रोहिणी,अंबा खंबाडे या गावांमध्ये भोंगर्या बाजाराची तयारी जोरात सुरू आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल लवकरच सुरू होणार आहे.
आदिवासी बांधवांच्या दिवाळीसारखा ओळखला जाणारा सण म्हणजे भोंगर्या उत्सव व होलिकोत्सव अवघ्या काही दिवसात येऊन ठेवला आहे. व्यवसायासाठी आदिवासी बांधव मोठ्या तयारीवर लागलेले असून सातपुड्याच्या गावांमध्ये व आदिवासी वस्तीमध्ये आदिवासी ढोलांचा आवाज ऐकू येऊ लागला आहे व ढोलांची सुधारणा करतांना दिसून येत आहेत.
तीन मार्च पासून बंगला बाजाराला सुरुवात होणार आहे. सातपुडा परिसरातील खेड्यांमध्ये तसेच मध्यप्रदेशातील वरला,बलवाडी आशा मोठ्या बाजारपेठेतील गावांमध्ये भोंगर्या बाजाराची तयारी सुरू झाली आहे. फाल्गुनी पौर्णिमेपासून सुरु होणाऱ्या होलीकोत्सवात गुजरात,महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये विखरलेली पावरा,गावित,मावची समाज एकत्र येत असतात. यंदाही सातपुड्याच्या परिसरातील तसेच दऱ्याखोऱ्यातील अतिदुर्गम भागातील मजुरीसाठी स्थलांतरित झालेले समाजबांधव उत्सवासाठी गावाकडे व आपल्या वस्तीकडे परतू लागले आहेत. आदिवासी बनवून मध्ये भोंगऱ्या बाजारासाठी उत्साह दिसून येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा