Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

शिरपूर शहरात 'प्रिंट वर्ड' या ओमसाई ग्रुप च्या नवीन शाखेचे उदघाटन संपन्न




शिरपूर प्रतिनिधी:आधुनिकतेच्या काळात सोशिअल मिडियात एक अग्रेसर पाऊल टाकत मॉडलिंग विश्वात विविध प्रकाराचे कलादर्शन आपापल्या परीने सिद्ध करण्याचा प्रयत्न युवा करीत असतो. 


त्यातच प्रतिस्पर्धीची जोडही अधिक असते. अशा परिस्थिती शून्यातून विश्व निर्माण करीत ओमसाई ग्रुपच्या माध्यमातून मित्र परिवाराच्या सहकार्याने सर्वांना सोबत घेऊन फोटोग्राफीच्या क्षेत्रात अप्लावधीतच नावलौकीक मिळवलेले ओमसाई ग्रुप च्या एका नवीन शाखेचे उदघाटन आज संपन्न झाले. 

सुरत व इंदोर सारख्या शहरातच मिळत असलेली सुविधा आज शिरपूर वासीयांच्या भेटीसाठी ओमसाई ग्रुप घेऊन आले आहेत. यात विशेष करून धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात अद्यापपर्यंत उपलब्ध नसलेली अत्याधुनिक एल इ डी फ्रेम, कॅनव्हास प्रिंट, क्लॉथ बॅनर, बॅक लाईट प्रिंट, टीशर्ट प्रिंट, मोबाईल कव्हर प्रिंट, फोटोग्राफी, विडिओ शूटिंग व मिक्सिंग सह सर्व प्रकारच्या प्रिंट चे एकमेव हबची निर्मिती शिरपूर शहरात शॉप नंबर १०६, श्री कृष्णा कॉम्प्लेक्स, राम कॉम्प्लेक्स शेजारी मेन रोड शिरपूर येथे 'प्रिंट वर्ड' या नावाने शहर वासीयांच्या सेवेत दाखल झाले आहे. 

'प्रिंट वर्ड' चे मालक श्री. दीपक वारुळे व श्री. प्रवीण बागले यांनी आई - वडील यांच्या हस्ते उदघाटनाचे नियोजन केले. तसेच श्री. अस्तिक सोनवणे, श्री. गोकुळ शिंपी (माऊली), श्री. निलेश पाटील, श्री. उदय माळी, श्री. गोकुळ भदाणे ह्या सहकाऱ्यांच्या सोबत ओमसाई ग्रुप यशस्वीपणे शिरपूर शहरात कार्यरत आहे.
याप्रसंगी ओमसाई ग्रुप चे सर्व सदस्य सहपरिवार उपस्थित होते. 

तर शिंदखेडा, शहादा, साक्री तालुक्यातील व शिरपूर फोटोग्राफर असोसिएशन, शिरपूर चे सर्व सदस्य उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध