Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

संतनगरी शेगावचा समर्थनगरी अक्कलकोटला सन्मान.. आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने सत्कार



बुलडाणा:प्रतिनिधी:मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यातील तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवार ८ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट जि. सोलापूर येथे आयोजित केला असता, त्याठिकाणी अमरावती विभागातून शेगाव तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

संत गजानन महाराज यांच्या संतनगरीचा हा श्री स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीत झालेला हा सत्कारच !

शेगाव तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार न्युज18 चे संपादक महेश म्हात्रे, परिषदचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व विश्वस्त किरण नाईक, आ. कल्याण शेट्टी, अध्यक्ष गजानन नाईक, कार्यध्यक्ष शरद पाबळे,  उपाध्यक्ष राजेंद्र काळे आदी मान्यवरांचे हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चौधरी, कार्याध्यक्ष नंदूभाऊ कुलकर्णी, उपाध्यक्ष अमर बोरसे सरचिटणीस देवानंद उमाळे, सदस्य देविदास कळसकार व जिल्हा कार्यकारणीचे सदस्य अनिल उंबरकार यांनी स्वीकारला.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन, कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्दे, सरचिटणीस नितीन शिरसाठ, उपाध्यक्ष विश्वास पाटील व युवराज वाघ प्रामुख्याने उपस्थित होते.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सभागृहात गजर झाला, गजानन महाराज की जय..!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध