Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
सामाजिक संघटन म्हणजे आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे एक व्यासपीठ: श्री अर्जुनभोई मुंबई
सामाजिक संघटन म्हणजे आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे एक व्यासपीठ: श्री अर्जुनभोई मुंबई
समाज सेवेच्यापातळीवर अनेक विचार प्रणालीचे समाजघटक असतात काही ईश्वरवादी, निरिश्वरवादी, विज्ञानवादी, श्रद्धाळू तर काही धर्मवादी.. समाजघटकांना त्यांच्या श्रद्धा जोपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणत्या देवाची पूजा करायची, केव्हा करायची, कशी करायची हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे पण त्यांचा हा अधिकार इतरांच्या हक्क आणि स्वातंत्र्याच्या आड येणार नाही याची काळजी मात्र त्यांनी घेतलीच पाहिजे.
तशाच समाज संघटनपातळीवरील काही गोष्टी समाजाच्या भल्यासाठी चांगल्या प्रबोधनात्मक असतात त्यांचा ही पुरस्कार जरुर जरुर करायला हवा, काही वाईट ही असतात त्यांचा मात्र त्याग करावा लागला तर तो करावा, काही कालबाह्य होत जातात त्या विचारपूर्वक बदलाव्या लागल्या तर अवश्य बदला तसा प्रयत्न केला तर तो योग्य होईल.
कोणताही समाज हा परिपूर्ण असूच शकत नाही... पण त्याचा प्रवास मात्र सतत पूर्णतेच्या दिशेनं सुरू असला पाहिजे. समाज सेवेच्यापातळीवर अनेक सामाजिक संघटन आज राज्यात कार्यरत अाहेत त्यांच्यातील विचार प्रणाली काही वेळा वेगळी असेल; परंतु समाजपटलावरील समाजहिताचा विषय राज्यात समोर आला तर संपूर्ण समाज संघटनांनी एकरुप होऊन तोही फक्त समाज म्हणुन समाजहितासाठी कार्य करण्यासाठी एकाच पटलावर येणे समाजासाठी हितावह ठरेल. सामाजिक एकतेच्या, एकरुपतेच्या पातळीवर येऊन कार्यरत राहणे कदापी योग्य च... समाज पटलावरील काही मात्र सोयीस्करपणे समाज संघटनच्या बाबतीतील आपल्याला हवा तसा सोयीचा अर्थ घेतात. कोणाला बदनाम करण्याकामी आपली नाठी बुध्दी ही उपयोगी करतांना दिसतात, काही तर स्वयंमच्या संघटना आड राहुन संघटन सदस्यांकडुन आपले विकृत विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या पापात बहुतेक सर्वेसर्वाच अधिक प्रमाणात सामील असतात अशामुळे अनेक सामाजिक संघटनात संघर्ष हा अटळ होतो.
बहुसंख्य समाज जेव्हा वैचारिक गुलाम असतो तेव्हा अश्या भुरट्या लोकांचा भाव अचानक एका रात्रीत वाढतो. खानदानी सरपटणारी ही विचार शैली स्वतःला सामाजिक पटलावर नाग समजायला लागतात. त्यातुनच सुमार बुद्धीच्या लोकांना विद्वानांचा मान मिळायला लागतो मग ते नको नको तसा हैदोस संघटन पातळीवर घालू लागतात. कोणता झेंडा घेऊ मी हाती? ही राजकिय ईच्छा शक्ती किंबहुना माझ्याच राजकिय पक्षाची झुलं आपण पांघरावीत ही विचार शैली मग संघटन पातळीवर सक्तीची व कृतीयुक्त केली जाते व ती करण्यासाठी तरी नसावी... अर्थात आपले निर्णय इतरांवर तरी लादू नका. सामाजिक संघटन पातळीवर जबरदस्ती करणारी माणसं कोणत्याही संघटन पातळीवरील असोत ती समाजसेवेच्या पातळीसाठी आतंकवादीच असतात, ते अतिरेकी विचाराची असतात, ती समाजात तेढ उत्पन्न करणारी असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशी माणसं मुळातच प्रामाणिक नसतात ती फक्त ढोंगी असतात, बदमाश असतात, विकृत असतात, खोटारडी असतात वरून किती ही दिखावा करत असले तरी त्यांचा समाजातील बाँटम लेव्हलवरील बंधुतेवर काडीचाही त्यांचा विश्वास नसतो.
स्वतःच्या स्वार्थासाठीच ते समाज विघातक काही कृत्य करून घेत असतात. समाजातील जनता ही मूर्ख आहे असा ही त्यांचा सिद्धांत असतो त्यांची तशी शेखीची खात्रीही असते म्हणून त्यांची तशी हिंमतही होते परंतु त्यांच्या कृतीस समाजातील तरुणांनी वेळेवर रोखणे हे समाजहितासाठी हितावह असेल..... जय भोई तत्सम जमातीघटक राज.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

फालतू लेख होता...आपल्या सुपीक डोक्यातून आला पण कोणाच्या उपयोगाचं असेल अस वाटत नाही...कित्येकांना समजणार नाही...हे लेख विचार हे सामान्य लोकांसाठी असतात जर त्यांना समजणार नसेल तर काय फायदा....
उत्तर द्याहटवा