Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हाअध्यक्ष पदी योगेश हजारे तर सचिवपदी नितेश मानकर यांची फेरनिवड
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हाअध्यक्ष पदी योगेश हजारे तर सचिवपदी नितेश मानकर यांची फेरनिवड
समाजाच्या हितासाठी झटत रहा - मनोहर सुने
खामगाव:प्रतिनिधी:सर्व सामान्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी त्यासोबतच पत्रकारांच्या हितासाठी सातत्याने कार्य करुन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांनी केले. ते शेगांव येथे आयोजित अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या बैठकीत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशअध्यक्ष कैलासबापु देशमुख हे होते.
या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. गेल्या 2 वर्षातील संघटनेची भरारी पाहून जिल्हाध्यक्ष पदी योगेश हजारे, जिल्हा सचिवपदी नितेश मानकर यांची फेरनिवड करण्यात आली. याच कार्यक्रमात वृत्तपत्र विके्रता पश्चिम विदर्भ उपाध्यक्षपदी उमेश सिरसाठ, शेगांव यांची निवड करण्यात आली तर श्रीकृष्ण काकडे यांची अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या पश्चिम विदर्भ कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच बुलडाणा जिल्हा वृत्तपत्र विके्रता संघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकृष्ण भगत यांची निवड करण्यात आली.
तर अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी अनुप गवळी व सहसचिवपदी मोहन हिवाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
तसेच खामगाव तालुका अध्यक्षपदी अमोल चरखे तर खामगाव तालुका सचिवपदी गजानन सुशिर भालेगाव, तालुका उपाध्यक्षपदी शांताराम तायडे, अनंत सिंग बोराडे, तालुका संघटक पदी सचिन बहुरुपे, सहसचिवपदी संतोष धुरंधर यांची निवड करण्यात आली आहे तर कार्यकारणी सदस्यांमध्ये नितीन इंगळे भालेगाव, शेख फारुक, खामगाव शहराध्यक्षपदी महेश देशमुख यांची फेर निवड करण्यात आली.
तसेच शेगांव तालुकाअध्यक्ष पदी सचिन कडुकार, तालुका सचिवपदी आयुषी दुबे तर शहराध्यक्षपदी सिद्धार्थ गावंडे, शहरसचिव पदी उमेश राजगुरे, शहरउपाध्यक्ष पदी दिनेश घाटोळ, शहर संघटकपदी सविता कडुकार यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणी मध्ये संजय त्रिवेदी, राजवर्धन शेगावकर, संदिप सिंहस्ते, राजकुमार व्यास, संजय ठाकूर, प्रशांत खत्री, सिद्धांत कलोरे, दादा बारखाते यांची निवड करण्यात आली आहे. उपरोक्त सर्व निवड व नियुक्त्या अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष कैलासबापु देशमुख यांनी केल्या आहेत. नवनिर्वाचित सर्व कार्यकारणी पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
या प्रसंगी प्रदेशअध्यक्ष कैलासबापु देशमुख, केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, जिल्हाध्यक्ष योगेश हजारे, उमेश सिरसाठ, नितेश मानकर आदींनी मनोगत व्यक्त करुन पत्रकार संघटना जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व शहरात सक्रियपणे कार्य करण्यासाठी संघटनेचे जाळे अधिकाअधिक वाढविण्यावर भर द्यावा असे आवाहन केले. बैठकीचे संचालन नितेश मानकर यांनी तर आभार प्रदर्शन उमेश सिरसाठ यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा