Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

धडगाव-मोलगी ते देवमोगरा पदयात्रा रवाना:





धडगाव:प्रतिनिधी:विश्व हिंदू परिषद बजरंग दल (धर्म प्रसार विभाग)देवगिरी प्रांत देवमोगरा माता पदयात्रा मंडळाने महाराशिवरात्रीचे औचित्य साधून देवमोगरा माता पदयात्रा पालखी सोहळा आयोजित केला  त्या अनुषंगाने धडगाव-खुंटामोडी-मोलगी-दहेल-मोगरा-वालंबा-होराफडी ते देवमोगरा ह्या मार्गी आज 


महाशिवरात्रीनिमित्त आदिवासी कुलदैवत देवमोगरा  मातेच्या दर्शनासाठी पायी पदयात्रेत 300 महिला-पुरुष यात्रेकरूंनी सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने श्रद्धेची प्रारूपता समाजासमोर मांडली.

पदयात्रेची सुरुवात विठ्ठल-रखुमाई मंदिर भोई गल्ली येथे देवमोगरा मातेच्या मूर्ती पूजनाने झाली.ह्या वेळी देवगिरी प्रांताचे विशेष संपर्क प्रमुख-भरतजी देवडे,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री विजयजी सोनवणे ,मुंगबारी वसतिगृह संचालक अशोकभाई पटेल,जिल्हासेवा प्रमुख धनंजय बारगळ,प्रखंड मंत्री राजाराम राणे, विभाग प्रमुख रोहन गिरासे,विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष तापीराम पावरा,उपाध्यक्ष गौतम शिवदे,धर्मप्रचार प्रमुख भिमसिंग पावरा,सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ढोले,कालुसिंग पाडवी,गुलाबसिंग पावरा,रोहिदास पावरा इ.उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध