Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील दबंगगिरी करून जनतेत दहशत निर्माण करत आहेत. शिरपुर शिवसेनाचे निवेदन
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील दबंगगिरी करून जनतेत दहशत निर्माण करत आहेत. शिरपुर शिवसेनाचे निवेदन
शिरपूर:प्रतिनिधी:शिवसेनेचे शिरपूर शहर प्रमुख व शिवसेना पदाधिकारी यांनी डिवायएसपी माने यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले की,पोलीस निरीक्षक पदी हेमंत पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी सर्व सामान्य जनतेला त्रास देण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे.
शिरपूर शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. अवैद्य व्यवसाय सुरु आहेत, राष्ट्रीय महामार्गावर अवैद्य व्यवसाय सुरु आहे मोटरसायकली चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.अनेक गुन्ह्यांचा अजूनही तपास झालेला नाही, असे असतांना नवनियुक्त पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यात्रोत्सवाला येणाऱ्या भावीकांना कायदा कानुन
शिकवतात.पोलिस निरीक्षक हेमंत पाटील हे दबंगगिरी करून जनतेत दहशत निर्माण करण्याचे काम करत आहेत.
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या वर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा शिरपूर शहर व तालुक्यात हेमंत पाटील यांच्या बाबतीत असंतोष वाढुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख हिम्मत महाजन,रजेसिंग राजपूत, तालुकाध्यक्ष भरतसिंग राजपूत,शहरप्रमुख मनोज धनगर,योगेश ठाकरे,विकास महिरराव, आदींच्या स्वाक्षरी आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा