Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेल.


३ रे आपत्य प्रकरणात अंगणवाडी सेविकेला न्याय मिळवून देणारी पहिली संघटना

हमारी युनियन हमारी ताकत

धुळे-जिल्हय़ातील धुळे प्रकल्प 1 या मधील अंगणवाडी सेविका श्रीमती संगीता राठोड राहणार अंचाडे तांडा (धुळे) यांना 3" रे अपत्य जन्माला आले म्हणूण बालविकास प्रकल्प अधिकारी  धुळे 1 यांनी त्यांना सेवेतून कायमस्वरूपी  कमी केले त्या विरोधात संघटनेने  जिल्हा स्थरावर व मंत्रालय स्थरावर निवेदने दिली त्याचा काहीही उपयोग झाला नाही अखेर सदर सेविकेला न्याय मिळवून देण्यासाठी धुळे कामगार न्यायालयात दिनांक 7-11-17 रोजी ulp-no.188/2017 रोजी केस दाखल केली त्याचे कामगार न्यायालयात कामकाज सुरू झाले कामगार न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तवाद येकुण  दिनांक 4- 2- 2020 रोजी अंगणवाडी सेविक़ेच्या बाजुने निकाल देऊन अंगणवाडी सेविक़ेला न्याय दिला आहे तसेच निकाल पत्रात म्हटले आहे कि. दिनांक 23-10- 2017 म्हणजे कमी केलेल्या दिनांका पासून मागील सेवा सलग धरुन पूर्ण मागील काळातले मानधन देऊन कामावर घेण्याचे आदेश दिलेले आहेत सदर निकाल हा राज्यातील ऐकमेव आपल्याच पनवेल संघटनेने पहिला निकाल मिळवलेला आहे संघटनेतर्फे कायदे तज्ञ अँड- एस बी पाटील यांनी खूप परिश्रम  घेतलेले आहेत. या निकालाचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने न्यायालयाचे अभिनंदन क़ेले आहे. 

नेतृत्व

अध्यक्षा - मायाताई परमेश्वर. कार्यअध्यक्ष - युवराज बैसाने, रामकृष्ण बी.पाटील अँड - गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम सुधीर परमेश्वर, अमोल बैसाने सर्व पदाधिकारी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध