Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०
चोपडा तालुक्यातील सत्रासेन ग्रामीण भागात आजही अंत्यसंस्कार उघड्यावरच
सत्रासेन प्रतिनिधी:सुभाष पाटील
ग्रामीण भाग म्हटला की शेतकरी, शेतमजुरांनी आयुष्यभर राबराब राबायच जिवंतपणी अनंत वेदना आणि हाल अपेष्टा सोसायच्या त्यातही कधी लाल्या तर कधी बोंड अळी या ना त्या अनेक कारणाने शेतकरी,शेतमजूर त्रस्त झालेल्या अवस्थेत दिसून येतो.
जीवनभर ग्रामीण भागातील जनता हाल-अपेष्टा करून आपले जीवन भागवत असतात.अशातच मरणानंतरही नरक यातना ग्रामीण भागातील जनतेला भोगावे लागत असतील तर किती दुर्दैव आहे. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होऊन गेले तरी सत्रासेन गावांमध्ये अजून पर्यंत समशान भूमी नाही किंवा दहनशेड नाही आजही सत्रासेन गावामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास उघड्यावरच अंत्यसंस्कार करावा लागतो.
सत्रासेन येथे समशानभूमी नसल्याने लगतच्या अनेर नदीच्या काठावर मोकळ्या जागेवर अंतिम संस्कार करण्यात येतो सत्रासेन गावात समशानभूमी शासनाकडून आज पर्यंत मंजूर झालेली नाही आहे. समशानभूमी लवकरात लवकर मंजूर व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा