Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

समाज एकता परिषदेच्या निमित्ताने सिंहावलोकन:श्री अर्जुनभोई,मुंबई



मुंबई:प्रतिनिध:जुन्या काळात दळणवळणाची साधने अधिक नसल्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शासनकर्त्यांची ने-आण करणारा, नदी किनारी नावाड्याच्या रुपात दिसणारा आणि एक विश्वासू समाज म्हणजे भोई तत्सम जमातीघटक... कालांतराने मालाची किंवा उच्च पदास्थांची ने-आण करण्यासाठी ही त्यांचा वापर केला जायचा. बैलगाडीद्वारे धान्य, मीठ किंवा इतर गरजेच्या वस्तूंची ही वाहतूक केली जात होती. शासन कर्त्यांच्या दरबारी असलेल्या प्रतिष्ठांची, मुंबईत गलबतांतुन मालाची ने-आण करण्यासाठी भोई तत्सम जमातीघटक जातीची नेमणूक होत होती. 

रस्त्यांची किंवा इतर मूलभूत सुविधांचा विकास झाला नसल्यामुळे भोई तत्सम जमातीघटक हाच उच्च पदस्थांना जंगलातून, रस्त्याने प्रवास करत असे. जंगलातून प्रवास करताना परकिय शक्तींचा, परक्या विभाग प्रमुखांचा, चोरांचा सामना देखील आपल्या समाजाला करावा लागत होता. याकरिता त्यांना उपजत प्रशिक्षण दिले जायचे. भोई तत्सम जमातीघटक समाजाचे सर्वात महत्वाचे योगदान म्हणजे युद्धकाळात विविध राज्यांना व त्यांच्या पदाधिकारी यांना युद्धभूमीवर नेण्यासाठी किंवा त्यांची सुखरुप सुटका करण्यासाठी या समाजाची मदत घेतली जात असे कारण आमचा खांदा हा विश्वासुपणाचा होता किंबहुना आमच्या रक्तातच तो विश्वासूपणा होता आणि आजही आहे. 

आमच्या तत्सम जमातीघटकाची संस्कृती ही परिसरपरत्वे काही ठिकाणी बदलली असल्याचे दिसून येते; परंतु व्यवसाय आणि त्यावरील कार्य हे एक समान आहेत. राज्यातील आम्ही संपूर्ण तत्सम जमातीघटक हे एकच आहोत. भोई तत्सम जमातीघटक समाजाचे जीवन हे सतत प्रवासाचे असल्यामुळे त्यांच्या संस्कृतीत विविध संस्कृतीचा समावेश आढळतो. भोई तत्सम जमातीघटक समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात जळगाव धुळे नाशिक नंदुरबार परभणी औरंगाबाद अहमदनगर नांदेड नागपुर चंद्रपूर यवतमाळ अमरावती लातुर वर्धा रामटेक बीड उस्मानाबाद कोल्हापूर सोलापूर पुणे सातारा सांगली मध्ये अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सातवाहन ते यादव कालखंडापर्यंत हे विभाग व्यापाराचे केंद्रबिंदू होते किंबहुना महाराष्ट्र राज्यात जाणताराजा अर्थात राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या सत्तेचा उदय आणि अस्त हा आमच्या समाजाने आपल्या डोळ्यांनी पाहीला. सद्याची स्तिथी पूर्वीपेक्षा वेगळी आहे. भोई तत्सम जमातीघटक समाज हा विविध क्षेत्रात विखुरलेला आहे. त्यांच्या मूळच्या व्यवसायाव्यतिरिक्त ते पोटासाठी इतर कामे ही करत आहेत. गावांमध्ये भोई तत्सम जमातीघटक समाजातील माणसे मच्छीमारी करणे, डांगरवाडी, गाढवावरून रेतीवाहतुक, शेतमजुराची कामे करत होती आणि काही ठिकाणी अजूनही करत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात विखुरलेला भोई तत्सम जमातीघटक समाज आपले पारंपरिक हक्क साजरे करण्यासाठी, समाजातील समस्या सोडविण्यासाठी काही ठिकाणी एकवटतो आहे; परंतु अजून ही त्यात म्हणावे तितके यश येतांना दिसत नाही. समाजातील समस्यां सोडवून हा समाज विकासाच्या दिशेने वाटचाल करेल तेव्हाच तो प्रगती करतो आहे असे समजण्यात येईल. समाजातील सदस्य हक्कासाठी सुशिक्षित होऊन आपल्या समस्या सरकार दरबारी मांडण्यापरी एकञरित्या कार्य व्हावे. इतर समाजासमोर हे समाजाचे लोकनेते आहेत ही सामाजिक पातळीवरील काहींची ईच्छा अजुनही पुर्ण झाली नाही आणि अनेक समस्या सोडवून विकासाचा मार्ग ही आमच्यासाठी खुला झाला नाही. काही ठिकाणी असा विखुरलेला समाज एकजुटीने संघटन पातळीवरील कार्याने एकरुपतेतुन पुढे सरसावण्यासाठी येत असेल तर त्याचे संपुर्ण समाजाच्या पातळीवर स्वागत होणे हे ही तितकेच अपेक्षित आहे. 

बहुजन समाजाप्रमाणे आपण ही आपल्यातील आप आपसातील मतभेद, तंटा दूर ठेवून समाज विकासाचा विचार करायला हवा आणि असा संदेश ही इतरांना देता यावा ही अपेक्षा आम्ही व्यक्त करत आहे. राज्यातील संपूर्ण भोई तत्सम जमातीघटक एका ठिकाणी एकञ येणे हे ही आज अति महत्वाचे झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध